महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा हरमनकडे

बीसीसीआयकडून महिला संघाची घोषणा

महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा हरमनकडे

लवकरच महिला विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार असून आयसीसीने नुकतेच स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. युएईमध्ये खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशकडे असून ही स्पर्धा ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने महिला टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून स्मृती मानधना हिला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघात १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. याशिवाय तीन ट्रॅव्हलिंग रिजर्व आणि दोन नॉन ट्रॅवलिंग रिजर्व यांची निवड करण्यात आली आहे. संघात श्रेयांका पाटील आणि विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटिया या दोन खेळाडूंचा समावेश मुख्य संघात करण्यात आला आहे. मात्र, या दोघी दुखापतग्रस्त असून स्पर्धेआधी दोघी पूर्णपणे फीट न झाल्यास इतर खेळाडूंना संधी मिळणार आहे.

महिला विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण आठ संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. तर, श्रीलंका आणि स्कॉटलंडने पात्रता फेरीतून स्थान मिळवलं आहे. या १० संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. ग्रुप ‘अ’मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. तर, ‘ब’ ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

मुंबईत दहीहंडीचा उत्सव शिगेला; १५ गोविंदा जखमी

पंतप्रधान मोदींवर टिप्पणी करणाऱ्या सपा नेता हाजी रझाच्या तीन मजली इमारतीवर बुलडोजर !

एक लाखाहून अधिक गोविंदांना विम्याचे सुरक्षा कवच

दोन लाख श्रीगणेश निघाले परदेशाला

भारताचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध ४ ऑक्टोबर रोजी असून भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ ६ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. तर, २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होतील. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. २० ऑक्टोबरला अंतिम सामना दुबईत होईल. तसेच उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आले आहेत.

भारतीय संघ-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार ), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक)*, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील* आणि सजना सजीवन.

भारतीय संघाचे सराव सामने

• २९ सप्टेंबर- रविवार, भारत वि. वेस्ट इंडिज, दुबई

• १ ऑक्टोबर- मंगळवार, भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुबई

भारतीय संघाचे सामने

• ४ ऑक्टोबर- शुक्रवार, भारत वि. न्यूझीलंड, दुबई

• ६ ऑक्टोबर- रविवार, भारत वि. पाकिस्तान, दुबई

• ९ ऑक्टोबर- बुधवार, दक्षिण आफ्रिका वि. स्कॉटलंड, दुबई

• १३ ऑक्टोबर- रविवार, इंग्लंड वि. स्कॉटलंड, शारजाह

Exit mobile version