पंड्या संघात परतल्यावर बाहेर कोण जाणार?

श्रेयस, शमी की सूर्यकुमार यादव

पंड्या संघात परतल्यावर बाहेर कोण जाणार?

दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या उर्वरित वर्ल्डकप सामन्यांसाठी सज्ज होईल तेव्हा तो भारतीय संघातील नेमक्या कुणाच्या जागी खेळू शकेल याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा त्यावेळी संघातील कुणाला बाहेर बसवेल आणि त्याजागी हार्दिकला संधी देईल, याचे उत्तर शोधले जात आहे.

 

पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या लढतीदरम्यान पंड्या घसरला होता आणि त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांत खेळू शकला नाही. त्याचा घोटा दुखावला असून त्यावर सध्या तो उपचार घेत आहे. पंड्य़ाच्या अनुपस्थितीत भारतीय संघात काही बदल करण्यात आले. सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळाले तर मोहम्मद शमीही संघात परतला. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे हे बदल केले गेले. हे दोन्ही सामने भारताने जिंकलेदेखील.

पहिल्या चार सामन्यांत शमीला संघात स्थान मिळू शकले नव्हते. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जेव्हा तो भारतीय संघातून खेळला तेव्हा त्याने पाच बळी घेतले आणि तो सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने ४ बळी घेतले. सूर्यकुमारनेही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चिवट फलंदाजी केली.

हे ही वाचा:

मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल

रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदाचे रहस्य

उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे

मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे निर्देश

 

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मदन लाल यांनी म्हटले आहे की, आगामी सामन्यांसाठी हार्दिक पंड्याची आवश्यकता भारताला भासेल. तेव्हा तो तंदुरुस्त असला पाहिजे. मदनलाल म्हणतात की, आपल्या संघात पाच गोलंदाज आहेत आणि सगळे उत्तम कामगिरी करत आहेत. हार्दिक संघाला सहावा पर्याय असेल. तो फलंदाजीही उत्तम करतो आहे. त्यामुळे भारतीय संघातील तो एक महत्त्वाचा भाग आहे.

 

हार्दिक आता तंदुरुस्त होत असून मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकेल. आतापर्यंत तो चार सामन्यांत खेळला आहे आणि त्याने ११ धावा आतापर्यंत केल्या आहेत. पण पाच बळीही मिळविले आहेत. मदन लाल म्हणतात की, पंड्या संघात येईल तेव्हा श्रेयस अय्यरला संघाबाहेर बसवता येईल. त्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली नाही. पण सूर्यकुमार पाचव्या क्रमांकावर येऊ शकतो आणि हार्दिक सहाव्या. केएल राहुलला चौथ्या स्थानावर खेळवता येईल.

Exit mobile version