भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या हा दुखापतीमुळे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेला आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूची कमी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे, हार्दिक ऐवजी नव्या खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे.
हार्दिकऐवजी प्रसिद्ध कृष्णा याची विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात वर्णी लागली आहे. प्रसिद्ध हा गोलंदाज आहे. दुखापतीमुळे हार्दिक स्पर्धेबाहेर पडल्यास त्याच्या जागी संघात एखाद्या अष्टपैलू खेळाडूचीच वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून परवानगी मिळाल्यानंतर या अननुभवी वेगवान गोलंदाजाचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला.
प्रसिद्ध कृष्णाने भारतीय संघात १७ वन डे खेळले असून या सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर २९ विकेट्स आहेत. याशिवाय कृष्णाने दोन टी- २० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर एकूण चार विकेट्स आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा कर्नाटकातून खेळतो. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळालं आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानी लष्कराच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला
इस्रायलचा गाझामधील शाळेवर एअर स्ट्राईक; २० जण ठार
उर्फी जावेद आली अडचणीत, बनावट पोलिसांना घेऊन व्हीडिओ बनविल्याचा आरोप
बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!
भारतीय संघाने सेमीफायनल्समध्ये एकही सामना न हरता प्रवेश केला आहे. यामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्याचा मोलाचा वाटा आहे. अशातच दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेला पांड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक पंड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.