हार्दिक आणि कुणाल पंड्याच्या सावत्र भावाला अटक!

फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई

हार्दिक आणि कुणाल पंड्याच्या सावत्र भावाला अटक!

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक पंड्या आणि कुणाल पंड्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा सावत्र भाऊ वैभव पंड्याला अटक करण्यात आली आहे.४.३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

२०२१ मध्ये तिघांनी मिळून (हार्दिक पंड्या, कुणाल पंड्या, वैभव पंड्या ) पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता.या कंपनीत हार्दिक आणि कृणालची हिस्सेदारी ४०-४० टक्के होती, तर वैभवची २० टक्के हिस्सेदारी होती आणि फर्म चालवण्याची संपूर्ण जबाबदारी वैभव पंड्याकडे सोपवण्यात आली होती.त्यानुसार व्यवसायातून मिळणारा नफाही त्याच प्रमाणात वाटून घ्यायचा होता. मात्र वैभव पंड्याने तसे केले नाही.कंपनीतून मिळणार नफा आपल्या भावांना देण्याऐवजी स्वतः वेगळी कंपनी स्थापन करून नफ्याची रक्कम त्यात वर्ग केली.

हे ही वाचा:

केमोथेरपीनंतर महिलेचे केस गळले,त्वचा खराब झाली, नंतर कळले कर्करोग झालाच नाही!

“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”

“नेहरूंमुळे भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनता आले नाही”

केजरीवालांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांना पदावरून हटवले

यामुळे हार्दिक आणि कृणालचे ४.३ कोटी रुपयांचे नुकसान झाले.वैभवने भागीदारी कराराचे उल्लंघन केले.टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, एका सूत्राने सांगितले- यामुळे मुख्य कंपनीचे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सावत्र भावाने कोणालाही न कळवता त्याचा नफा २० टक्के वरून ३३.३टक्क्यांपर्यंत वाढवला, ज्यामुळे क्रिकेटर आणि त्याच्या भावाचे नुकसान झाले. सावत्र भावाने भागीदारी असलेल्या फर्मच्या खात्यातून लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवून एक कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.त्यामुळे करारातील अटींचे उल्लंघन आणि पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी वैभव पंड्याला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version