पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगवर धर्मांतराचा आरोप केला होता.इंझमाम-उल-हकच्या आरोपावर टीका करत हरभजन सिंग उत्तर दिले आहे.इंझमाम-उल-हकची सध्याची स्थिती योग्य नसल्याने त्याने डॉक्टरांना भेटले पाहिजे, असे ट्विट हरभजन सिंगने केले आहे.
हरभजन सिंग इस्लाम धर्म स्वीकारण्यास उत्सुक होते असा आरोप इंझमाम-उल-हकने केला होता.यावर हरभजन म्हणाला की, इंझमामची मानसिक स्थिती ठीक नसल्याने डॉक्टरांकडे जावे.पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक एका मुलाखती दरम्यान म्हणाला होता की, अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताच्या मालिकेदरम्यान मौलाना तारिक जमीलचे ऐकल्यानंतर हरभजन सिंग इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या विचारात होता, असा आरोप इंझमामने कार्यक्रमात केला होता.त्यानंतर हरभजन सिंगने इंडिया टुडेला या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इंझमाम-उल-हकच्या आरोपावर उत्तर दिले.
हे ही वाचा:
‘व्हेल’ डन; व्हेल माशाच्या पिल्लाला जीवनदान
दिवाळीच्या कार्यक्रमात मारहाण, गोळीबार; पोलिसांच्या ताब्यातील आरोपीला जमावाने सोडवून नेले!
ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!
ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!
हरभजन सिंग म्हणाला, इंझमाम मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्यामुळे त्याला कोणीतरी डॉक्टरकडे घेऊन जावे.मला एवढेच सांगायचे आहे की, कोणीतरी इंझमाम उल हक याला डॉक्टरांकडे घेऊन जावे. त्याची मानसिक स्थिती योग्य नाही, कृपया त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.
ही सर्व नाटके तो मीडियासमोर करत आहे, मला कळत नाही की तो अशी विधाने द्यायची कशी ठरवतो.मला माहिती नाही की तो किती धूम्रपान करतो, किंवा किती मद्यपान करतो. मात्र मी तुम्हाला खात्री करून सांगू इच्छितो की जे काही तो बोलतो ते मद्यधुंद अवस्थेत बोलतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला काहीही आठवत नाही,हरभजन पुढे म्हणाला. त्यांनतर हभजन सिंगने एक ट्विट करत लिहिले की, हा कोणती नशा करून बोलत आहे?,मला गर्व आहे भारतीय आणि शीख असल्याचा.हे मूर्ख माणसे काहीही बोलतात.