हरभजन सिंगचे क्रिकेटला अलविदा

हरभजन सिंगचे क्रिकेटला अलविदा

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवार २४ डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हरभजनने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर हरभजनने हा निर्णय घेतला आहे. तर निवृत्तीनंतर हरभजनची नवीन इनिंग काय असणार याची नेटकरी चर्चा करताना दिसत आहेत.

१९९८ साली अवघ्या अठरा वर्षांच्या वयात हरभजन सिंह याने भारतीय संघासाठी पदार्पण केले. आपल्या २३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हरभजन सिंग याच्या नावावर तब्बल ७११ आंतरराष्ट्रीय विकेट नोंदवण्यात आल्या आहेत. तर कसोटी सामन्यात हरभजनने ९ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. भारतातील एक यशस्वी ऑफस्पिनर म्हणून त्यांची गणना केली जाते.

हे ही वाचा:

तुकाराम सुपेंच्या घरातील घबाड संपेना; ३३ लाख जप्त

‘समाजवादी अत्तर’ बनवणाऱ्या उद्योजकांवर आयकर विभागाची धाड! सापडले १५० कोटी रुपये

अतुल राणे यांची ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती 

आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो

हरभजन याने २०१६ साली भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो आयपीएल सामने खेळताना दिसला. तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये समालोचकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. आता पाच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर हरभजनने वयाच्या ४१ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे.

या संबंधात त्यांने एक भावनिक अशा स्वरूपाची सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. सर्व चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपुष्टात येतात, आज मी त्या खेळायला अलविदा म्हणत आहे ज्याने मला आयुष्यात सर्व काही दिले. हा तेवीस वर्षांचा प्रदीर्घ प्रवास ज्यांच्यामुळे सुंदर आणि यादगार झाला त्या सर्वांचा मी आभारी आहे असे हरभजनने म्हटले आहे.

Exit mobile version