27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषखलिस्तान्यांना शहिद म्हणत भज्जीची हिट विकेट

खलिस्तान्यांना शहिद म्हणत भज्जीची हिट विकेट

Google News Follow

Related

खलिस्तानी फुटीरतावादी भिंद्रनवाले याला शहीद म्हटल्यामुळे क्रिकेटपटू हरभजन सिंह हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हरभजनच्या या विधानासाठी वादग्रस्त विधानासाठी त्याच्याविरोधात चीड व्यक्त केली जात असून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. आपल्या एका ताजा सोशल मीडिया पोस्टवरून हरभजनने हा वाद ओढवून घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह याची एक इंस्टाग्राम पोस्ट हे साऱ्या वादाचे मूळ ठरली आहे. आपल्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये टाकलेल्या एका पोस्टमध्ये हरभजन सिंह यांनी ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये मारले गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी या लोकांचा शहीद असा उल्लेख केला. यात जर्नेल सिंह भिंद्रनवाले याचे नाव हरभजनने घेतले नसले तरीही ब्लू स्टार ऑपरेशनमध्ये मारले गेलेल्यांमध्ये भिंडरावाले सह इतर अनेक खलिस्तानी फुटीरतावाद्यांचा समावेश होता. त्यामुळेच फुटीरतावादी नेत्यांना ‘शहीद’ म्हणणाऱ्या हरभजन सिंग विरोधात टीकेची झोड उठली आहे. हरभजनच्या या ट्विटसाठी अनेक बड्या ट्विटर अकाउंट्सवरून हरभजनवर हल्लाबोल सुरु आहे.

हे ही वाचा:
ठाकरे सरकारचा आता नालेसफाई घोटाळा?

सिद्धूना उपमुख्यमंत्रीपदही नाही आणि प्रदेशाध्यक्षपदही नाही

सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राची लसीकरणाच्या नासाडीत आघाडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

जर्नेल सिंह भिंद्रनवाले याच्या नेतृत्वात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी पंजाब मधील पवित्र सुवर्ण मंदिरावर कब्जा केला होता. त्यांच्या तावडीतून सुवर्ण मंदिर मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याकडून ऑपरेशन ब्लू स्टार राबवले गेले होते. १९८४ साली १ जून ते १० जून दरम्यान हे ऑपरेशन राबवण्यात आले होते. यावेळी चकमकीत भिंद्रनवाले सोबत इतर ५५४ फुटीरतावाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याकडून करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा