आज २ ऑगस्टचा दिवस खास आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, तिरंग्याचा आदर करण्याच्या सामूहिक मोहिमेचा एक भाग म्हणून आपला देश ‘हर घर तिरंग्या’साठी सज्ज झाला आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजवर डीपी बदलला आहे आणि तुम्ही पण असे करा, असे मी आवाहन करताे, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मंगळवारी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील प्रोफाइल फोटो बदलला आहे. त्यांनी आपल्या सर्व सोशल मीडिया हँडल्सच्या प्रोफाईल फोटोवर तिरंगा लावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी . नड्डा यांनी देखील आपल्या डीपीमध्ये तिरंगा फडकावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव जनआंदोलनात रूपांतरित होत असल्याचे सांगितले होते आणि जनतेला २ ते १५ ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘तिरंगा’ प्रोफाइल पिक्चर म्हणून वापरण्यास सांगितले होते.
‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ९१ व्या आवृत्तीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. ‘माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपण स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चर्चा सुरू केली, देशभर दौरा केला. पुढच्या वेळी भेटल्यावर पुढच्या २५ वर्षांचा आमचा प्रवास सुरू झालेला असेल. आपल्या लाडक्या तिरंग्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे. आमच्या घरोघरी तिरंगा फडकवला जाईल. तुम्ही स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला ते माझ्यासोबत शेअर करा. तुम्ही काही खास केले असेल तर तेही सांगा. पुढच्या वेळी आपण आपल्या अमृतपर्वाच्या विविध रंगांबद्दल पुन्हा बोलू. तोपर्यंत मी तुम्हाला निरोप देतो. खूप खूप धन्यवाद.’
हे ही वाचा:
अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले
माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत
राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं
कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?
पिंगली व्यंकय्या यांना आदरांजली
तिरंग्याची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. आम्हाला तिरंगा देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आपला देश त्यांचा सदैव ऋणी राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्हाला आमच्या तिरंग्याचा खूप अभिमान आहे. माझी इच्छा आहे की तिरंग्यातून शक्ती आणि प्रेरणा घेऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य करत राहावे.