25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसॅल्युट आशाताई!

सॅल्युट आशाताई!

आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त

Google News Follow

Related

कजरा मोहोब्बत वाला…
इन आँखो की मस्ती मे,
रोज रोज आँखो तले,
ये मेरा दिल…
रेशमाच्या रेघांनी,
सांज ये गोकुळी अशा एका पेक्षा एक सदाबहार गीतांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांचा ८ सप्टेंबर हा जन्मदिवस.

मंगेशकर कुटुंबातील हे एक असं रत्न ज्यांनी शास्त्रीय संगीतापासून डिस्कोपर्यंत सर्वप्रकारच्या गायनात मनमोकळी मुशाफिरी केली. भारतातील प्रत्येक प्रादेशिक भाषांमध्ये अगणित गाणी गाणाऱ्या या गोड गळ्याच्या आणि तेवढ्या गोड स्वभावाच्या गायिका आशा भोसले यांना न्यूज डंकाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आशाताई आज ९० वर्षांच्या झाल्या. त्या अवघ्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचे वडील गेले. आशा भोसले यांचे वडील म्हणजे प्रख्यात नाट्यसंगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर.

वडील गेल्यानंतर आशाताईंची मोठी बहीण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होती. त्यामुळे लता मंगेशकर यांनी वयाच्या तेराव्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत आशा भोसले यांनी सिनेविश्वात पाऊल ठेवले. आशाताईंनी गायला सुरुवात केली तेव्हा हिंदी सिनेविश्वात लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि गीता दत्त अशा गायिकांचं वर्चस्व होतं. अशा अनेक मोठ्या गायिकांमध्येही स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणं हे आव्हान आशाताईंनी लिलया पेललं.

असं म्हटलं जातं की, एका मोठ्या झाडाच्या सानिध्यात दुसरं झाड कधीही बहरू शकत नाही. लता मंगेशकर यांच्यासारख्या महावृक्षाखाली आशाताईंच्या संगीताचं रोप कसं टिकेल, कसं वाढेल. पण आशाताईंनी स्वतःला सिद्ध केलं. त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आशा भोसले स्वतःची शैली विकसित करत होत्या. भावगीते, गझल, ठुमरी, डिस्को कोणताच गायन प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता.

लता मंगेशकर आणि आशा भोसले एकाच क्षेत्रात एकाच क्षेत्रात असल्यामुळे आपोआपच तुलनाही होत होती. लता दीदी आणि आशा भोसले यांच्यामध्ये स्पर्धा आहे ओरड केली जायची. लोकांमध्ये हा नेहमी चर्चेचा विषय असायचा. मात्र आशा भोसले आणि लता दीदी यांनी अशा चर्चांना कधीही महत्व दिले नाही. लता मंगेशकरांसोबत कधी स्पर्धा होती का? असे सवालही अनेकदा आशा भोसले यांना करण्यात आले होते. मात्र नेहमीच आशा भोसले यांनी याचे सकारात्मक स्पष्टीकरण दिले. एका मुलाखतीत आशा यांना हा सवाल करण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, लता दीदींची गाण्याची शैली माझ्यापेक्षा खूप वेगळी होती. आम्ही इतरही अनेक गोष्टींमध्ये एकमेकींपेक्षा खूप वेगळ्या आहोत. आम्ही एकमेकींच्या जवळ आहोत, पण आमच्यात कधीही स्पर्धा नव्हती. मला त्यांच्यासोबत गायला नेहमी आवडतं, माझं गाणं हे माझ्यासारखं होत मी माझं वेगळं स्थान निर्माण केलं, असे आशा भोसले यांनी सांगितलं होतं. लता दीदी आणि आणि आशा भोसले यांच्या नात्यात कधीही संघर्ष आला नव्हता, तो लोकांनी आणला लोकांनी सतत तराजू वापरत. ही चांगली गाते की ती चांगली गाते अशी तुलना केली. पण असं कधीही नव्हतं लता दीदींची एक वेगळी स्टाइल होती तर आशा भोसले यांची वेगळी स्टाइल होती.

हिंदीसोबतच आशा भोसलेंची मराठी कारकीर्दही बहरली, त्यांनी ‘माझं बाळ’ या चित्रपटात पहिल्यांदा गाणं गायलं होत. दादाभाई फाळके पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फ्लिम फेअर पुरस्कारासह त्यांना गौरवण्यात आलं होत. २००८ ला पद्मविभूषण पुरस्काराने सुद्धा आशा यांना सन्मानित करण्यात आलं होत. एवढच नाही तर २०१३ साली त्यांनी माई या सिनेमात अभिनयसुद्धा केला होता. ग्रॅमीसाठी नामांकन मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. ९०० चित्रपटात १४ हून अधिक भाषांमध्ये आणि बारा हजाराहून अधिक गाणी गाणाऱ्या आशाताई यांनी हिन्दीसिनेसृष्टी गाजवली. संगीताबरोबरच जेवण बनवण्यातही त्यांचा हातखंडा. विविध प्रकारचे रुचकर खाद्यपदार्थ बनविण्यात त्यांची हातोटी. माणसाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रेजेंटेबल राहावं असं आशा ताई यांचं मतं आहे. आजही एखाद्या रिऍलिटी शोमध्ये आशाताई जातात तेव्हा तोच अवखळपणा, तोच मनमोकळेपणा, तीच शिस्त, स्वरांवरची हुकुमत पाहायला मिळते. आशाताईंना दीर्घायुष्य लाभो ही न्यूज डंकाच्या वतीने प्रार्थना.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा