उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (१३ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारा विरोधात, दादर मधील हनुमान मंदिरासह अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर भाजपाकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
बांगलादेशात आणि मुंबईमध्ये मंदिरे सुरक्षित नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत. देवेंद्र फडणवीस याचं हिंदुत्व काय करतंय, एक है तो सेफ है मग मंदिर कुठे सेफ आहेत?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपा सरकार दादर मधील हनुमान मंदिर पडायला निघाले आहे, रेल्वे खात्याकडून मंदिर पाडण्याचा फतवा काढण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.
यावर उत्तर देताना भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले, एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडले जाणार नाही, हा हिंदूंना शब्द आहे. अनधिकृत मशीदीवरचा विषय नितेश राणे आणि मी उचलला. मुंबईमधील १२ मशिदी पाडण्यासाठी आम्ही नोटीस दिल्या.
उद्धव ठाकरेंना मस्जिद वाल्यांची बाजू घ्यायची आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही मस्जीदी पडणार आणि मंदिरे वाचवणार हे निश्चित, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.
हे ही वाचा :
ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंना तीन पदके
उद्धव ठाकरे तुमचं बेगडी हिंदू प्रेम जनतेने पाहिलंय!
भाजपाचे शिर्डीत प्रदेश अधिवेशन, मुख्यमंत्र्यांचा केला जाणार भव्य सत्कार!
‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा नाही!
दरम्यान, दादरमध्ये हमालांनी बांधलेले ८० वर्ष जुने हनुमान मंदिर पाडण्याची मध्य रेल्वेकडून नोटीस देण्यात आली आहे. ७ दिवसात मंदिर प्रशासनाने योग्य भूमिका न घेतल्यास मंदिर पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा नोटीसमध्ये उल्लेख आहे. ८० वर्षांपूर्वी वृक्षाजवळ हनुमानाची मूर्ती सापडल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे. मंदिराची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात १९६९ मध्ये सार्वजनिक विश्वस्त म्हणून झाली आहे.