जय श्रीराम… राम मंदिराच्या मार्गावर हनुमान, गरुड, सिंह

दोन्ही बाजूंना बांधलेल्या स्लॅबवर या मूर्ती बसवल्या आहेत

जय श्रीराम… राम मंदिराच्या मार्गावर हनुमान, गरुड, सिंह

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीला जोर आला असतानाच, हे मंदिर कसे असेल, याची उत्सुकताही तमाम रामभक्तांना आहे. राम मंदिराच्या मुख्य प्रवेशमार्गावर हत्ती, सिंह, हनुमान आणि गरुडदेवतेच्या मूर्ती स्थानापन्न झाल्या आहेत. त्याही भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र असतील. या सर्व मूर्ती राजस्थानच्या बन्नी पहारपूर परिसरातील वाळूच्या दगडापासून घडवण्यात आल्या आहेत.

‘या सर्व मूर्ती मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस आणि दक्षिण दिशेकडील बाहेर पडण्याच्या मार्गावर असतील. संपूर्ण मंदिराचे बांधकाम तीन मजली म्हणजेच तळ अधिक दोन मजली आहे,’ अशी माहिती मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली होती. भाविकांना मंदिरात पोहोचण्यासाठी पूर्व दिशेकडून ३२ पायऱ्या चालाव्या लागतील.

हे ही वाचा:

भारत-नेपाळ संबंधांना मिळाली नवी ‘ऊर्जा’ ; जलविद्युत मेगा करार

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० तोफगोळे डागले

हिजबुलचा वॉन्टेड दहशतवादी जाविद अहमद मट्टू दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!

राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार

या सर्व मूर्ती गुरुवारी राम मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात आल्या आहेत, असे मंदिर ट्रस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना बांधलेल्या स्लॅबवर या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत.

 

ट्रस्टने दिलेल्या चित्रांनुसार, खालच्या स्लॅबवर प्रत्येक हत्तीची एक मूर्ती, दुसऱ्या स्तरावर सिंहाची मूर्ती आणि सर्वांत वरच्या स्लॅबवर प्रभू हनुमानाची मूर्ती एका बाजूला तर, दुसऱ्या बाजूला गरुडाची मूर्ती आहे.
संपूर्ण मंदिर संकुल पारंपरिक नगरीच्या शैलीत साकारले गेले आहे. या मंदिराची लांबी ३०० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. प्रत्येक मंदिराची उंची २० फूट उंच असून मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ प्रवेशद्वारे आहेत.

Exit mobile version