दिल्लीत रस्त्यावर नमाज, आता हिंदू संघटनांकडून हनुमानचालिसा!

निलंबित पोलिसाच्या समर्थनार्थ दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर लोकांची गर्दी

दिल्लीत रस्त्यावर नमाज, आता हिंदू संघटनांकडून हनुमानचालिसा!

दिल्लीतील इंद्रलोकमध्ये रस्त्यावर नमाज पठणावरून नुकताच वाद निर्माण झाला होता.मात्र, हा वाद आता नवे रूप धारण करताना दिसत आहे.काही हिंदू संघटनांनी मंगळवारी(१२ मार्च) इंद्रलोक मेट्रो स्टेशनच्या खाली हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आहे.अशा परिस्थितीमुळे परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांपुढे पुन्हा एकदा आव्हान वाढले आहे.दुसरीकडे, दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी निलंबित पोलीस अधिकारी मनोज तोमर यांच्या समर्थनार्थ हनुमान चालीसाचे पठण केले.

पोलिसांनी हिंदू संघटनांना हनुमान चालीसाचे पठण करू दिलेले नाही.परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे.दरम्यान, ही बातमी लिहू पर्यंत हनुमान चालीसा पठण करण्यासाठी कोणीही इंद्रलोक मेट्रो स्टेशनच्या खाली पोहचले न्हवते.

हे ही वाचा..

मुंबई उपनगरच्या हरमित सिंगला ‘महाराष्ट्र श्री’चा मान

वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

पंतप्रधान मोदींचा नव्या १० वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा!

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपासून काढला पळ?

दरम्यान, गेल्या आठवड्यात इंद्रलोक रस्त्यावर नमाजपठण केल्याने वाद निर्माण झाला होता.रस्त्यावर नमाज पठण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असे.याबाबत काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली.त्यावर पोलिसांनी रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना हटवण्याचा प्रयत्न केला.यादरम्यान पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज तोमर यांनी रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या काही लोकांना लाथेने मारत असल्याचा व्हिडिओ समोर आला.यानंतर वातावरण तापले.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले.पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा प्रयत्न या समाजाकडून करण्यात आला.वाढता विरोध पाहून पोलीस अधिकारी मनोज तोमर यांना निलंबित करण्यात आले.मात्र, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ आला, ज्यामध्ये पोलीस रस्त्यावरील लोकांना समजावत उठवण्याचे काम करत होते.यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी पोलीस अधिकाऱ्याचे समर्थन केले.रस्त्यावर नमाज पठण करणे हे चुकीचे असल्याचे अनेकांनी लिहिले.

Exit mobile version