आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सिडनी कसोटीतील हिरो हनुमा विहारी हा राज्याच्या संघातून बाहेर पडला आहे. त्याने सोशल मीडियावर हा निर्णय जाहीर केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने आपल्याला अवमानित केल्याचा दावा त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला आहे.
रणजीमधील केवळ एका सामन्यानंतर राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला आंध्रचे कर्णधारपद सोडण्यास भाग पाडले गेले. बंगालविरुद्धच्या सामन्यात तो संघाच्या १७व्या क्रमांकाच्या खेळाडूवर ओरडला होता. त्यामुळे हा सामना जिंकूनही असोसिएशनने त्याला कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितल्याचा आरोप विहारी याने केला आहे. त्या खेळाडूचे राजकीय हितसंबंध असल्यानेच आपल्याला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. असे त्याचे म्हणणे आहे.
… या आहेत घडामोडी
रणजी ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यानंतर हनुमा विहारी याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. रणजी हंगाम संपल्यानंतर हनुमा याने इन्स्टाग्रामद्वारा आपण आंध्र क्रिकेटला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले.
राजकीय दबावामुळे आंध्रच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्याचा हनुमान विहारीचा आरोप.
बंगालविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तो १७व्या क्रमांकाच्या खेळाडूवर ओरडला. मात्र तो खेळाडू राजकीय नेत्याचा मुलगा असल्याने त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी झाली.
हे ही वाचा:
पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर यांचा पदाचा राजीनामा!
आलोक कुमार विहिंपचे नवे अध्यक्ष; परांडे संघटन सचिव, देशपांडे सहसचिव
तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…
राज्याच्या संघासाठी सर्व काही करूनही असोसिएशनने आपल्याला अवमानित केल्याचा विहारी याचा आरोप.
राजकीय नेत्याचा मुलगा असणाऱ्या पृध्वीराज याने विहारीवर उलट टीका केली आहे. तो आपल्यावर ओरडल्याचे आणि त्याने शिवराळ भाषेचा वापर केल्याचा दावा पृध्वीराज याने केला आहे.
आक्षेपार्ह वर्तन हे अस्वीकारार्ह असून विहारीकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पृध्वीराज याने इन्स्टाग्रामवर केला आहे.पहिला रणजीचा सामना झाल्यानंतर आपल्या संघसहकाऱ्याचा मला पाठिंबा होता, हे दर्शवणारे पत्रही विहारीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
या पत्रात सर्व खेळाडूंनी विहारीनेच कर्णधारपदी राहावे, असे नमूद केले असून त्याने कोणतेही गैरवर्तन न केल्याचेही स्पष्ट केले आहे.या पत्रावर संघातील सर्व १५ सहकारी खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सन २०२१मध्ये सिडनी कसोटी सामन्यात विहारी याने जखमी असूनही १६१ धावा करून भारताचा सामना अनिकाली ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतर भारताने ही मालिका २-१ने जिंकली होती.