उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर शिवसेनाभवनाचा प्रश्नही उपस्थित झाला. पण आता एका वकिलाने न्यायालयात शिवसेनाभवन, शिवसेनेचा सर्व निधी व सर्व शाखा एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात ही याचिका करण्यात आली असून आता त्यातून काय निष्पन्न निघते ते बघता येईल ऍड. आशीष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका करून उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला आहे. दादर मुंबई येथे असलेले शिवसेनाभवन, सर्व शाखा, बँकाँमध्ये असलेला शिवसेनेचा निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी आहे.
या याचिकेवर २४ एप्रिलला सुनावणी घ्यावी अशी मगणीही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव यासंदर्भात निर्णय घेत शिंदे यांना या दोन्ही गोष्टी सोपविल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्याला आव्हान देण्यात आले. त्याची सुनावणी २४ एप्रिलला आहे. त्याच दिवशी गिरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. आता या दोन्ही सुनावण्या एकाच दिवशी होणार का, याबद्दल न्यायालयाने काहीही सांगितलेले नाही.
हे ही वाचा:
आता गुजरातमधील उभी राहतेय भगवान द्वारकाधीश यांची १०८ फूट उंचीची मूर्ती
पावसापासून बचाव करण्यासाठी ते शेडखाली उभे होते, पण झाडाने जीव घेतला
स्वातंत्र्यवीरांना जुंपलेल्या कोलूतून अडीच किलो शेंगदाण्याचे तेल काढताना लागले दोन तास…
लिट्टेला सक्रिय करण्याचा कट , एनआयएची छापेमारी, मोठ्या प्रमाणावर रोकड ,ड्रग्ज जप्त
मुख्य म्हणजे गिरी यांनी ही याचिका का केली आहे, त्यांचा या विरोधी पक्षांशी काही संबंध आहे, याची माहिती घेतली जाणार आहे. गिरी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे संघटनेचे मुख्यालय, शाखा, निधी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावा. शिवाय, २४ एप्रिलला दोन्ही सुनावणी एकत्र कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
गिरी यांनी म्हटले आहे की, ही याचिका शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेली नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. मी एक मतदार आहे. जर उद्या उद्धव ठाकरे अध्यक्ष झाले तर त्यांच्याकडे शिवसेनाभवन, शाखा व निधी राहील पण आता शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आहेत त्यामुळे त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी सुपूर्द केल्या पाहिजेत.