मृतदेहांतून हात बाहेर आला आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाय पकडला!

कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातानंतर घडला धक्कादायक प्रसंग

मृतदेहांतून हात बाहेर आला आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाय पकडला!

कोरोमंडल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात २७५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. यापैकी १०१ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यादरम्यानच, बचावकार्य सुरू असताना रेल्वे रुळांवर पडलेले मृतदेह उचलून नेण्यात येत होते. ते सगळे मृतदेह एका शाळेत आणले गेले. अनेक लोकांच्या या मृतदेहातून अचानक रॉबिन नय्या हा जिवंत असल्याचे समोर आले आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

 

बचावकार्य करणारे या शाळेत गेले. तिथे कुजलेल्या अवस्थेत असलेले मृतदेह काढण्यासाठी त्यांनी शाळेत प्रवेश केला आणि त्यातील एक या मृतदेहांच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढत पुढे जात होता, तेव्हा मृतदेहातील एका हाताने त्या कर्मचाऱ्याचा पाय धरला. त्यानंतर तिथून आवाज आला. मला पाणी द्या, मी मेलेलो नाही.

 

मृतदेहातून कुणीतरी पाय धरल्याने तो कर्मचारी थंडच पडला पण त्याने त्या मृतदेहाकडे पाहिले तेव्हा तो ३५ वर्षीय रॉबिन जिवंत असल्याचे त्याला दिसले. पण ते हलू शकत नव्हता, पण वाचविण्यासाठी आर्त हाक देत होता. त्या कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले.

हे ही वाचा:

काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी

चर्चगेटमधील महिला वसतीगृहात तरुणीची बलात्कार करून हत्या

गोराईत होणार छत्रपती शिवरायांचे वॉर म्युझियम

पूल कोसळल्यानंतर आता काम सुरू असलेल्या रुग्णालय इमारतीला भेगा

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणातील चर्नेखाली गावातला रॉबिन हा नागरीक आहे. या रेल्वे अपघातात त्याचे दोन्ही पाय त्याने गमावले पण तरीही तो जिवंत राहिला. याच गावातील रॉबिनसह सात इतर लोकही या रेल्वेतून प्रवास करत होते. हावडा ते आंध्र प्रदेश असा प्रवास करण्यासाठी त्यांनी कोरोमंडल एक्स्प्रेस पकडली होती. काम शोधण्यासाठी ते निघाले होते.

सध्या रॉबिनवर उपचार सुरू आहेत. रॉबिनटचे काका मानवेंद्र सरदार म्हणाले की, माझा पुतण्या रॉबिन काम शोधण्यासाठी या रेल्वेने गेला होता. जेव्हा हा अपघात घडला त्यात तो बेशुद्ध झाला. त्यामुळे तो मृतदेहांमध्येच होता.   

Exit mobile version