मराठी चित्रपटसृष्टीत सध्या शिवकालीन चित्रपटांची लाट आली आहे. या लाटेत प्रवीण तरडे हे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावर चित्रपट घेऊन येत आहेत. या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होत असून आज या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आले. अवघ्या काही तासातच ट्रेलरला प्रेक्षकांची भरभरून पसंती लाभताना दिसत आहे.
प्रवीण तरडे यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटसुद्धा सबकुछ प्रवीण तरडे या प्रकारचा असणार आहे. या चित्रपटात प्रविण तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यासोबत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन हे देखील प्रवीण तरडे यांचेच आहे.
हे ही वाचा:
ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण
“हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीनचे दात पाडावे”
नातवंडे द्या, नाहीतर पाच कोटी भरपाई द्या; न्यायालयात केला अजब दावा
शरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल
या चित्रपटात प्रेक्षकांना विशेष पसंतीस पडत आहे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असलेले अभिनेते गश्मीर महाजनी. गश्मीर महाजनी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघताना प्रेक्षकांची विशेष पसंती लाभत आहे. गश्मीर महाजनी यांचे व्यक्तिमत्त्व, शरीरयष्टी, अभिनय या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या भूमिकेला अतिशय साजेशा होत असल्याचे प्रेक्षकांचे मत आहे.
२७ मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असून तिकीट बारीवरही हा चित्रपट चांगली घोडदौड करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संदीप मोहिते पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून मराठीतील एक बिग बजेट सिनेमा असे या चित्रपटाकडे पाहिले जात आहे.