हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!

हमासचा इस्रायलशी युद्धविराम वाढवण्याचा प्रयत्न

हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!

इस्रायल-हमासचा चार दिवसीय युद्ध बंदी करारानुसार हमासच्या गटाने तिसऱ्या टप्प्यात १७ ओलिसांची सुटका सुटका केली आहे.सुटका केलेल्या १७ ओलिसांमध्ये १३ इस्रायली, तीन थाई आणि एक रशियन नागरिकाचा समावेश आहे.तसेच हमासने म्हटले आहे की, जर इस्राइलने अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले तर, चार दिवसीय युद्धविरामचा करार वाढवला जाईल.हमासच्या गटाने रविवारी २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी १७ ओलिसांची सुटका केली.हमासच्या तावडीतून सुटलेले हे लोक इस्रायलमध्ये पोहोचले.

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसच्या म्हणण्यानुसार, हमासकडून सोडण्यात आलेल्या १७ ओलिसांमध्ये १३ इस्रायली नागरिक, तीन थाई आणि एक रशियन नागरिक आहेत.दुसरीकडे, इस्रायलने ३९ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली.इस्रायलकडून सुटका करण्यात आलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांचे वेस्ट बँकची राजधानी रामल्ला येथे स्वागत करण्यात आले.

हे ही वाचा:

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया

खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या

इस्रायल-हमास युद्धबंदीचा चार दिवसीय कराराचा कालावधी वाढवला जाऊ शकतो असे हमासकडून सांगण्यात आले आहे.रॉयटर्सच्या बातमीनुसार हमासकडून याबाबत एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलने अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यासाठी गंभीर प्रयत्न केल्यास युद्धविराम वाढविला जाऊ शकतो.

हमासच्या गटाकडून सुटका करण्यात आलेल्या १७ ओलिसांमध्ये अबीगेल एडन (४) या चिमुकलीचा समावेश आहे.जो बिडेन यांनी या चिमुरडीला मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते.ही मुलगी अमेरिकन-इस्त्रायली नागरिक असून किबुत्झ काफ्र अजा येथील रहिवासी आहे.७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान तिच्या पालकांना हमासच्या सैनिकांनी मारले हे या मुलीने पहिले होते, त्यांनतर तिचे अपहरण करण्यात आले होते.

 

 

Exit mobile version