हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मृतदेहांखाली विस्फोटके सोडली होती. जेणेकरून अधिकाधिक मानवहानी होईल. इस्रायली लष्कराचे याहलोम युनिट आता ही स्फोटके आणि शस्त्रे जमा करते आहे. याचा वापर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करताना केला होता. लष्कराला मृतदेहांच्या खाली ही स्फोटके मिळत आहेत. यात मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये सात किलोची स्फोटके आणि रिमोटने चालणारी यंत्रे मिळाली आहेत.
दहशतवाद्यांनी जाणुनबुजून बॅगमध्ये स्फोटके ठेवली होती. त्यांचा उद्देश अधिकाधिक नुकसान करण्याचा होता. हमासच्या दहशतवाद्यांना सायनाइड बॉम्बचा वापर करण्याचेही निर्देश दिले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे.
हमासचे दहशतवादी इस्रायलवर सायनाइडवर आधारित रासायनिक बॉम्बचा हल्ला करणार होते, असा दावा इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांजवळून यूएसबी डिव्हाइज हस्तगत करण्यात आले आहेत. ज्यात सायनाइडवर आधारित रासायनिक बॉम्ब बनवण्याचे निर्देश दिले होते. इस्रायलच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिव्हाइसमध्ये असलेल्या सायनाइडचा फैलाव करण्यासाठी काही आकृत्या तयार करण्यात आल्या होत्या. त्याला यूएसबीमध्ये टाकण्यात आले होते. म्हणजे हमासच्या दहशतवाद्यांचा रासायनिक शस्त्रांचा वापर करण्याचे इरादे होते, असे स्पष्ट होते, असे इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ज्या प्रकारे आयआयएसला दहशतवादी हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्याचप्रमाणे हमासलाही देण्यात आले होते.
हे ही वाचा:
भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!
फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया पवारांनीच रचला!
‘गगनयान’ मोहिमेत महिलांचाही सहभाग असू शकतो’!
शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!
‘हे अल-कायदाचे डिझाईन’
इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी हे डिझाईन अल-कायदाचे असल्याचा दावा केला आहे. सन २००३मध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेने रासायनिक शस्त्रांनी हल्ला करण्याचा कट आखला होता. आम्ही आयएसआयएस. अल कायदा आणि हमासशी लढत आहोत, असे ते म्हणाले.