हमासच्या प्रमुखानंतर लष्कर प्रमुखालाही केले ठार !

इस्रायलने केली पुष्टी

हमासच्या प्रमुखानंतर लष्कर प्रमुखालाही केले ठार !

हमासचा प्रमुख इस्माईल हनियाच्या मृत्यूनंतर हमासच्या लष्कर प्रमुखाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद डेफ असे हमासच्या लष्कर प्रमुखाचे नाव असून याला ठार करण्यात आले आहे. इस्रायलने याची पुष्टी केली आहे. हमासचा सर्वोच्च लष्करी कमांडर मोहम्मद डेफ हा जुलैमध्ये मारला गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. मोहम्मद डेफ हा इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड आहे. मोहम्मद डेफचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. इस्रायली लष्कराने गुरुवारी (१ ऑगस्ट) एक निवेदन जारी करून हमासचा लष्करी कमांडर मोहम्मद डेफ जुलैमध्ये हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे म्हटले आहे.

गाझाच्या दक्षिणेकडील खान युनिस भागात केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा लष्कर प्रमुख ठार झाला. इस्रायली लष्कराचे हे वक्तव्य हमासच्या राजकीय शाखेचे प्रमुख इस्माइल हानिया यांच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर आले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये बुधवारी (३१ जुलै) हानियाची हत्या करण्यात आली होती.

हे ही वाचा:

केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानी गुंड फिरतोय का? बिभव कुमार प्रकरणी न्यायालयाचा सवाल

नेमबाज स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक !

आत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण

इस्रायली सैन्याने सांगितले की, १३ जुलै रोजी खान युनिस भागात असलेल्या एका कंपाउंडला लक्ष्य करून हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात मोहम्मद डेफ ठार झाला आहे. मोहम्मद डेफ या कंपाउंडमध्ये आल्याची माहिती इस्रायली लष्कराला मिळाली होती. डेफ आल्याची माहिती मिळताच कंपाऊंडवर हवाई हल्ला करण्यात आला, मात्र, या हल्ल्यात मोहम्मद डेफ मारला गेला की नाही याची पुष्टी होऊ शकली न्हवती. आता याची पुष्टी करण्यात आली असून मोहम्मद डेफ मारला गेला असल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले.

Exit mobile version