पहलगामचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजला?

दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संघटना आयएसआयकडून खडतर प्रशिक्षण

पहलगामचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजला?

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात चार दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. चारही हल्लेखोरांचे फोटो आणि इतर माहिती उघड झाली आहे. यातील दोन दहशतवादी पाकिस्तानचे तर दोन स्थानिक दहशतवादी आहेत. प्रशासनाने स्थानिक दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत एकाचे घर जमीनदोस्त करण्यात आले तर दुसऱ्याच्या घरात तपासणी दरम्यान स्फोट होवून उध्वस्त झाले. याच दरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचा कट पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिजल्याचे समोर आले आहे. स्थानिक दहशतवाद्यांना पाकव्याप्त कश्मिरच्या शिबिरात प्रशिक्षण देण्यात आले होते. विशेष म्हणजे, या शिबिरात हमासने लष्कर- ए -तोयबाच्या ( LeT ) आणि जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर एक विशेष प्रशिक्षण शिबिरात एक मॉड्युल तयार केले होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संघटना आयएसआयकडून खडतर प्रशिक्षण देण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सरकारच्या निमंत्रणावर हमासचे नेत्याने पाकिस्तानला नुकीतच भेट दिली होती. त्यावेळी हमासच्या नेत्याला पीओकेला नेण्यात आले होते. त्या ठिकाणी नेत्याची लष्कर- ए -तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी भेट झाली. त्यावेळी रावलकोट येथे एका रॅलीचे आयोजन केले होते आणि त्यांची घोड्यांवरुन अशी मिरवणूक काढण्यात आली जणू ते क्रांतिकारक होते.

हे ही वाचा : 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांना एनएसईकडून १ कोटी रुपयांची मदत!

तेलंगणात १४ माओवाद्यांचे आत्मसमर्पण!

नौदल अधिकारी विनय नरवालच्या अस्थी विसर्जित करताना वडिलांचा बांध फुटला

पर्यटकांना वाचवताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून मदत!

या रॅलीतून त्यांना एकच संदेश द्यायचा होता, तो म्हणजे काश्मीरी आणि पॅलेस्टीनी एकाच पॅन-इस्लामिक जिहादचा भाग आहेत. यासह भारत आणि इस्रायल विरुध्द एकजुट होणे गरजेचे असल्याचे यांच्या बैठकीमध्ये ठरल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यक्रमात हमासचे प्रवक्ते डॉ. खालिद कद्दूमी आणि डॉ. नाजी जझीर यांचे साथीदार वरिष्ठ नेता मुफ्ती आझम आणि बिलाल अलसल्लात देखील उपस्थित होते.

तसेच पाकिस्तानातील अनेक मोठे अतिरेकी नेते देखील सामील असल्याची माहिती आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ, लॉन्चिंग कमांडर असगर खान कश्मीरी आणि लष्कर- ए -तोयबाच्या अनेक वरिष्ठ कमांडरचा समावेश आहे.

Exit mobile version