‘हमास’ची क्रूरता उघड; हॅरी पॉटरच्या छोट्या चाहतीचा मृतदेह आढळला!

वृत्तसंस्था, तेल अविव

‘हमास’ची क्रूरता उघड; हॅरी पॉटरच्या छोट्या चाहतीचा मृतदेह आढळला!

इस्रायल आणि हमासमधील संघर्ष चिघळला असून ‘हमास’च्या दहशतवाद्यांची नृशंस कृत्ये दिवसेंदिवस उघड होत आहेत. हॅरी पॉटर या चित्रपटाची १२ वर्षांची इस्रायली मुलगी आणि तिची ८० वर्षांची आजी यांचे मृतदेह आढळले आहेत. ७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ज्या इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवण्यात आले होते, त्यामध्ये या दोघींचा समावेश होता. त्यांची सुटका करण्यासाठी हॅरी पॉटरच्या लेखिकेने सोशल मीडियावर पोस्टही लिहिली होती. एका वृत्तानुसार, आताही हमासने २००हून अधिक जणांना ओलिस ठेवले आहे.

इस्रायलची १२ वर्षीय मुलगी नोया डॅन आणि तिची आजी कार्मेला यांचे मृतदेह आढळले आहेत. जेव्हापासून नोयाचे अपहरण झाल्याचे वृत्त आले आहे, तेव्हापासून तिच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर आवाहन केले जात आहे. सोमवारी हॅरी पॉटरच्या लेखिका जे. के. रॉलिंग यांनी मुलीच्या सुटकेसाठी एक आवाहनपर पोस्टही केली होती.
हमासने शुक्रवारी रात्री अमेरिकी नागरिक जुडिथ रानन आणि त्यांची मुलगी नताली यांची सुटका केली. या दोघांचे किबुत्झ नाहल ओझ येथून अपहरण करण्यात आले होते.

हे ही वाचा:

भारताची गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

वॉर्नर, मार्शच्या शतकांनी ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला विजय

राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले

फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!

७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ओलिस ठेवलेल्या २०३ नागरिकांपैकी ही पहिलीच सुटका होती. कतारने या प्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे हमासने हे पाऊल उचलले आहे. या दोघा अमेरिकी नागरिकांना रेड क्रॉस संघटनेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना इस्रायलकडे सुपूर्द करण्यात आले. मानवतावादी दृष्टिकोनातून ही सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version