८ फेब्रुवारी रोजी हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने शुक्रवारी मशिदींमध्ये शुक्रवारची नमाज अदा करण्यास बंदी घातली आहे. मशिदींमध्ये शुक्रवारची नमाज अदा केली जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.प्रशासनाच्या आदेशानंतर लोकांनी घरोघरीच नमाज अदा केल्या. तसेच, बनभुलपुरा भागात हिंसाचाराच्या ९व्या दिवशी कर्फ्यूमध्ये शिथिलता वाढवण्यात आली आहे.
शुक्रवारी या भागात दोन ऐवजी तीन तास कर्फ्यू शिथिल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. लाईन नंबर, किडवाई नगर, गफूर बस्ती, मलिक का बगीचा, इंदिरा नगर, शनी बाजार रोड येथे शिथिलता असणार आहे.तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बनभूलपुरा येथे तीन तासांसाठी जनरल स्टोअर्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणार आहेत .त्यानुसार वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी घरच्या बाहेर पडावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.तसेच गौजाळी, रेल्वे मार्केट, एफसीआयमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिथिलता असेल.
हे ही वाचा:
‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’
‘हिंसेला माफी नाही, कोणतीही हिंसा अस्वीकारार्ह’
मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाजाच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल स्वीकारला
दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. एसएसपी नैनिताल प्रल्हाद नारायण मीणा यांनी सांगितले की, आतापर्यंत ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या अन्य ९ आरोपींना कोर्टाकडून ॲटॅचमेंट ऑर्डर मिळाले असून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे एसएसपी नैनिताल प्रल्हाद नारायण मीणा यांनी सांगितले.