उत्तराखंड: हल्द्वानीत झालेली दंगल आधीच नियोजित होती!

नैनितालच्या डीएम वंदना सिंह यांचा खुलासा

उत्तराखंड: हल्द्वानीत झालेली दंगल आधीच नियोजित होती!

उत्तराखंडमधील हल्दवानी येथील बेकायदेशीर मशिदी-मदरशावर बुलडोझर चालवल्यानंतर परिसरात हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे.हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात असलेल्या या मशिदीवर महापालिकेने गुरुवारी जेसीबी चालवला.त्यानंतर परिसरातील लोकांनी प्रशासनाच्या अधिकारी, पोलीस आणि पत्रकारांवर दगडफेक केली.दगडफेकीचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि संपूर्ण परिसरात जाळपोळीच्या घटना घडल्या.

या हिंसाचारात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला असून डझनभर जखमी झाले आहेत.परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.मात्र, हल्दवानी हिंसाचारप्रकरणी प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे.हल्द्वानी येथील हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचे सांगण्यात आले आहे.नैनितालच्या डीएम वंदना सिंह यांनी ही माहिती दली.

नैनितालच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी सांगितले की, मशीद-मदरसा पाडण्यापूर्वी नोटीस देण्यात आली होती. नोटीस दिली तेव्हा तेथे एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड नव्हते. मात्र, कारवाईच्या दिवशी अचानक एवढे दगड आले कुठून?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.त्या पुढे म्हणाल्या की, महापालिकेने मशिदीवर कारवाई करत हटवून टाकली.परंतु, अवघ्या अर्ध्या तासात जाळपोळीच्या घटना सुरु झाल्या.तसेच मशिदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या घरांच्या गच्चीवरून पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांवर दगडांचा वर्षाव सुरू झाला.

हे ही वाचा..

हल्दवानीमध्ये दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

‘मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच!’

भाजप, रास्व संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी पीएफआयचा ‘रिपोर्टर’ गट!

‘यूपीचा कार्यकाळ म्हणजे संकटजनक परिस्थिती’

 

वंदना सिंह पुढे म्हणाल्या, ‘उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हल्द्वानीमध्ये विविध ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. सर्वांना नोटीस देऊन सुनावणीसाठी वेळ देण्यात आला होता. काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली, तर काहींना वेळ देण्यात आला.तर काहींना वेळ दिला गेला नाही. जेथे वेळ दिला गेला नाही तेथे पीडब्ल्यूडी आणि महापालिकेकडून पाडकामाची कारवाई करण्यात आली, असे वंदना सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, बनभुलपुरा भागात झालेल्या हिंसाचारानंतर तणावपूर्ण परिस्थिती पाहता हल्द्वानी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version