उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!

अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक

उत्तराखंड: हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक पोलिसांच्या ताब्यात!

उत्तराखंडमधील हल्दवानी येथे झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला अटक करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि उत्तराखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने मलिकला दिल्लीतून अटक केली आहे.

यापूर्वी पोलिसांनी शोधमोहीम राबवून नगरसेवकांसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.हल्दवानी हिंसाचारात दगडफेक, पेट्रोल बॉम्ब, बेकादेशीतर शस्त्रे आणि जाळपोळ यात सहभागी असलेल्या सुमारे ५० संशयितांना अटक करण्यात आली आहे.हिंसाचारातील आरोपीना पकडण्यासाठी पोलीस पथक दिल्ली, युपी आणि हरियाणा या ठिकाणी छापे टाकत आहे.

हे ही वाचा:

सिक्कीम येथील जत्रेत घुसला ट्रक, तीन ठार

निवडणूक निकालानंतर पाकिस्तानमध्ये निदर्शने; निकालविलंबाने गोंधळ वाढला

 मेडिकलच्या विद्यार्थांना रील्स केल्याबद्दल दंड

पुणे: भुवनेश्वर पुणे एक्स्प्रेसमधून १२० किलो गांजा जप्त!

तसेच बनभूलपुरामध्ये एसएसबीचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.दरम्यान, उत्तराखंडमधील हल्दवानी येथे झालेल्या हिंसाचाराचा प्रमुख अब्दुल मलिकचे नाव पुढे आले होते.आता अब्दुल मलिकलाही पोलिसांनी आज दिल्लीतून अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र, पोलिसांनी याबाबत बोलण्यास टाळले आहे.

दरम्यान, हल्दवानी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर बंद करण्यात आलेली इंटरनेट सुविधा आज रविवारी पूर्ववत करण्यात आली आहे.तसेच प्रशासनाने बाधित भाग वगळता शहरातील उर्वरित भागातून संचारबंदी उठवली आहे. डीएम वंदना यांनी सांगितले की, संपूर्ण बनभुलपुरा परिसर, आर्मी (कॅन्ट) वर्कशॉप लाइन, तिकोनिया-तीनपाणी गौलापार बायपास परिसर वगळता संपूर्ण शहर कर्फ्यूमुक्त करण्यात आले आहे. कर्फ्यूग्रस्त भागात दूध, रेशन आणि औषधे पोहोचवण्याची व्यवस्था प्रशासनाची टीम करत आहे, असे नैनिताल जिल्हाधिकारी वंदना यांनी सांगितले.

Exit mobile version