शेती आणि खाद्य प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरणाने आल्या सुचनपत्रातून ‘हलाल’ आणि ‘इस्लामिक’ हे दोन शब्द वागलाल आहेत. हिंदुत्ववादी संघटना आणि शीख संघटनांच्या प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे. शेती आणि खाद्य प्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण ही भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाची शिखर संस्था आहे. ‘अपेडा’ नावाने प्रसिद्ध असलेली ही संस्था शेती आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीला बढावा देण्यासाठी काम करते.
अपेडाच्या सूचनापत्रात “इस्लामी देशांच्या गरजेनुसार प्राण्यांची कत्तल हलाला पद्धतीने केली जाते” असे म्हटले होते. या विरोधात समाज माध्यमांवर आवाज उठवला गेला आणि प्रचंड टीका झाली. अखेर अपेडाने सूचना पत्रात बदल केला आहे. अपेडा नव्या सूचनपत्रात “आयातदार देशांच्या गरजेनुसार प्राण्यांची कत्तल केली जाते” असे म्हटले गेले आहे. या नव्या सूचनापत्रातून ‘हलाल’ आणि ‘इस्लामी’ या दोन शब्दांना कात्री लावण्यात आली आहे. हलाल मांस ही भारत सरकारची गरज नसून बहुतांश आयातदार इस्लामी देशांची गरज आहे. ती गरज भरून काढण्यासाठी हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या स्वतंत्र संस्था आहेत. कुठल्याही सरकारी संस्थेची यात भूमिका नाही.
कुराणच्या नियमांचे पालन करून ज्या प्राण्यांची कत्तल केली जाते अशा माणसाला ‘हलाल’ मांस म्हणतात. इस्लाम अशाच पद्धतीच्या मांसाला मान्यता देते. इतर सर्व प्रकारच्या मांसाला इस्लाम मध्ये ‘हराम’ अर्थात निषिद्ध मानले जाते. इस्लामी देशांसोबत व्यवसाय करण्यासाठी सर्व प्रकारच्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.