उत्तर प्रदेश: ५० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणाऱ्या १० मुस्लिमांची घरवापसी!

शुद्धीकरण यज्ञानंतर हिंदू नावे स्वीकारली

उत्तर प्रदेश: ५० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणाऱ्या १० मुस्लिमांची घरवापसी!

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका मुस्लिम कुटुंबातील १० सदस्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. गुरुवारी (३ एप्रिल ) बागरा येथील योग साधना यशवीर आश्रमात, स्वामी यशवीर महाराजांनी हवन-यज्ञ करून या लोकांना शुद्ध केले. या कुटुंबाने ५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. आता त्यांनी म्हटले आहे की ही चूक होती, आता आपल्याला आपल्या पूर्वजांच्या सनातन धर्माकडे परत जायचे आहे.

आश्रमाचे मुख्य पुजारी स्वामी यशवीर महाराज आणि आचार्य मृगेंद्र ब्रह्मचारी यांनी वैदिक मंत्रांनी शुद्धीकरण यज्ञ केला. कुटुंबातील सर्व सदस्यांनी तूप आणि साहित्याचा नैवेद्य दाखवला. या काळात, कुटुंबातील सर्व १० सदस्यांनी त्यांची इस्लामिक नावे सोडून हिंदू नावे स्वीकारली. कुटुंबाची प्रमुख फेमिदा आता राजकुमारी बनली, त्यांचा मुलगा दिलजान ब्रिजेश कश्यप झाला आणि त्याची पत्नी मेहक कविता झाली. फेमिदा यांच्या नातवंडांची नवे देखील बदलण्यात आली.

सनातन धर्म स्वीकारल्यानंतर फेमिदा म्हणाल्या, “आता माझे नाव राजकुमारी आहे. मी ५० वर्षांपूर्वी चूक केली होती. आता मी माझ्या धर्मात परतले आहे. मी खूप आनंदी आहे. ईदनंतर माझ्या धर्मात परतण्याचा मी संकल्प केला होता. आता तो पूर्ण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

मुस्लिम जमातचे रझवी वक्फ विधेयकाच्या पाठीशी

काँग्रेस वक्फ सुधारणा विधेयकाला देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान

वक्फचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला तुडवले, संभलमधील घटना

“वक्फ सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर होणे देशासाठी ऐतिहासिक क्षण”

आश्रमाचे मुख्य पुजारी स्वामी यशवीर महाराज म्हणाले, मुस्लीम कुटुंब शुद्धी यज्ञाद्वारे सनातन धर्मात परतले आहेत. ते कश्यप जातीचे आहेत. स्वामी यशवीर महाराज म्हणाले, “भारतात राहणारे सर्व मुस्लिम पूर्वी हिंदू होते. इस्लामी राजवटीत त्यांच्या पूर्वजांवर अत्याचार झाले. अनेकांनी लोभामुळे सनातन धर्म सोडला. कोणीही आनंदाने किंवा त्याच्या शिकवणींनी प्रभावित होऊन इस्लाम स्वीकारला नाही. आम्ही सर्व धर्मांतरित मुस्लिमांना त्यांच्या पूर्वजांची चूक सुधारण्याचे आवाहन करतो. सर्वांनी सनातन धर्मात परत यावे. लाखो आणि कोट्यवधी मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. हिंदू धर्मात येऊ इच्छिणाऱ्या मुस्लिमांचे आम्ही स्वागत करतो.”

Exit mobile version