ज्ञानवापीत सर्वे होणारच! सर्वोच्च न्यायालयाचा फैसला

ज्ञानवापीत सर्वे होणारच! सर्वोच्च न्यायालयाचा फैसला

सर्वोच्च न्यायालयात आज ज्ञानवापी मशिदी संदर्भातील महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानेच निकाल द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीत व्हिडिओग्राफीसह होणाऱ्या सर्वेला आता सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाला असे म्हटले जात आहे. त्यामुळे वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा सर्वे होणारच आहे.

वाराणसी जिल्हा सत्र न्यायालयाने ज्ञानवापी मशिदी संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देताना नेमलेल्या कलेक्टरच्या समोरच मशिदीचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते. तरी या संपूर्ण सर्वेचे व्हिडिओग्राफी करावी असेही वाराणसी न्यायालयाने म्हटले होते. वाराणसी न्यायालयाच्या या निकालाविरोधात अंजुमान इंतेझामिया मस्जीद समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला

आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी

वाराणसी न्यायालयाने सर्वे बाबत दिलेला निकाल चुकीचा असल्याचे मस्जीद समितीच्या वकिलांमार्फत सांगितले गेले. तर सुरुवातीपासून जिल्हा न्यायालयाने दिलेले आदेश समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पण असे असले तरीही सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात जिल्हा न्यायालयाच्या बाजूने निकाल दिला आहे.

पण सर्वोच्च न्यायालयाने या विषयात जिल्हा न्यायालयातच सुनावणी व्हावी असे म्हटले आहे. हा खटला एखाद्या वरिष्ठ अनुभवी न्यायाधीश समोर चालवली जावी असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. तर या प्रकरणात जिल्हा न्यायालयाचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Exit mobile version