भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अहवालात ज्ञानवापीचे मंदिर नागर शैलीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच शैलीत काशीचे विश्वनाथ मंदिरही आहे. अयोध्येतील रामलल्लाचे मंदिरही आधी नागर शैलीतले होते. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ज्ञानवापी हेदेखील भव्य हिंदू मंदिर होते. मंदिराची एकंदरित रचना अयोध्येतील राम मंदिराशी मिळतीजुळती आहे. प्रवेशद्वारानंतर दोन मंडप आणि गर्भगृहाची कल्पना केली आहे.
नागर शैलीतच साकारलेल्या अयोध्येच्या रामलल्ला मंदिरात प्रवेशानंतर मंडप आणि अंतिम टप्प्यात गर्भगृह आहे. ज्ञानवापीमध्ये पूर्वेकडील भिंतीच्या पुढे मंदिर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पूर्वेकडील भिंत बंद असल्याने त्यापुढील सर्वेक्षण भारतीय पुरातत्त्व खात्याचे पथक करू शकले नाही.
हे ही वाचा:
दिल्ली: जागरण कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, एकाचा मृत्यू तर १७ जखमी!
नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, भाजपसोबत युती!
जल्लोषाला किंतु-परंतु जे गोलबोट…
मराठा आरक्षणाच्या मोर्चात चोरट्यांनी लंपास केला पावणे चार लाखांचा ऐवज
भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अहवालात तीन रहस्ये समोर आली आहेत. ही रहस्ये उघड करावी, अशी मागणी हिंदू पक्ष आता करणार आहे. पूर्वेकडील भिंत बंद करण्यात आली आहे. येथे विहीर मिळाली आहे. ही भिंत बंद का आहे, हे जाणणे आवश्यक असल्याचे हिंदू पक्षाने नमूद केले आहे.
तसेच, जी विहीर सापडली आहे, त्याची काय मान्यता आहे आणि तेथे काय आहे, तसेच, वजूखानेच्या पुरातत्त्व सर्वेक्षणाची मागणीही करण्यात आली आहे. या जागेत अनेक ठिकाणी खोदकाम करण्याची आवश्यकता नमूद करण्यात आली होती. मात्र न्यायालयाची स्थगिती असल्याने असे होऊ शकले नाही. मात्र आता येथे पुन्हा खोदकामाला परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली जाणार असल्याचे हिंदू पक्षाचे वकील सुभाष चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.