पश्चिम बंगालमध्ये गुरुवार, १३ जानेवारी रोजी रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील जलपाइगुडी इथे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिकानेर गाडीचे काही डबे रुळावरून घसरून अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त होते, पण नंतर आलेल्या माहितीनुसार ३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
माहितीनुसार, पटना- गुहाहटी बिकानेर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १५६३३) या गाडीला बिकानेरहून गुहाहटीकडे जात असताना आज संध्याकाळी ५ वाजता अपघात झाला. या गाडीचे चार डबे रुळावरून घसरले आहेत. या गाडीला एकूण २४ डबे होते. मोयनागुरी पार करताच हा अपघात झाला. अद्याप जखमींची अधिकृत संख्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्वरित बचाव कार्य सुरू करण्याचे आणि जखमींना उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
Guwahati-Bikaner Express 15633 (up) derailed at about 5 pm this evening. Details awaited pic.twitter.com/It93WwAsu8
— ANI (@ANI) January 13, 2022
हे ही वाचा:
दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानमध्ये निसटला
कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद
छगन भुजबळ अडचणीत; क्लीन चीटला उच्च न्यायालयात आव्हान
ठाकरे सरकारची प्रताप सरनाईकांवर कृपादृष्टी
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, स्थानिक पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्याला सुरुवात केली आहे. अलीपुरद्वारचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (डीआरएम) दिलीप कुमार सिंह म्हणाले की, “या अपघाताबद्दल प्राथमिक स्तरावर माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून जखमींना बाहेर काढणे हे आमचे प्राधान्य आहे. रेल्वेचे चार डबे पलटी झाल्याची माहिती असून मदतकार्यासाठी विविध पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.”