भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटें विरोधात आरोपपत्र!

भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटें विरोधात आरोपपत्र!

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधातील विविध खटल्यांविषयी देशमुख यांना विचारले असता “काही दिवसांपूर्वी आमच्याकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी भिडे-एकबोटें विरोधात आरोपपत्र दाखल करायचा प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही त्यावर तातडीने कारवाई करू” असं गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. पण भिडे गुरुजी आणि एकबोटें विरोधात असलेल्या वेगवेगळ्या खटल्यांपैकी नेमक्या कोणत्या खटल्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव आहे, याची माहिती मात्र देशमुखांनी देण्याचे टाळले. मात्र अशा प्रकरणामध्ये भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमाअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते.

२०१८ साली कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी ३६ केसेस दाखल केल्या होत्या. यापैकी १६ केसेसमध्ये भिडे गुरुजी आणि एकबोटे यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले असून १८ केसेसमध्ये समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version