23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषगुलाब चाकीवादळाचे मराठवाड्यातही थैमान

गुलाब चाकीवादळाचे मराठवाड्यातही थैमान

Google News Follow

Related

गुलाब चक्रीवादळामुळे अचानक निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा औरंगाबाद जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुरामुळे एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी नाशिक १, जालना १, बीड २, उस्मानाबाद २, परभणी २, लातूर १, बुलढाणा १, यवतमाळ ३ मृत्यू झाले आहेत. तर ४ जण जखमी झाले आहेत. २०५ जनावरांचे या पुरात मृत्यू झाले आहेत. एनडीआरएफ एअर फोर्सची एक तुकडी कार्यरत आहे तर एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मदत कार्य सुरु आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या ४८ तासात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यातील छोट्या मोठ्या धरणांतून पाणी सोडण्यात आलं आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीच्या आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील २८ घरं आणि २५ झोपड्यांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे औरंगाबादमधील ११,बीडमधील १२, जालना जिल्ह्यातील ५ घराचं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा:

…अखेर ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड इतिहासजमा

भारतीय लष्कराची ‘आकाश’ गवसणी

नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’

पंजाबमध्ये भाजपाला ‘कॅप्टन’ मिळणार?

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं संपूर्ण मराठवाड्याला फटका बसला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेऊन असून नुकसानाचं प्रमाण कमी राहावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं जयंत पाटील म्हणाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळं औरंगाबाद  शहरालाही फटका बसला. औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा