महाविकास आघाडी सरकारच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया बराच काळ रखडल्यामुळे अखेरीस नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) बुलेट ट्रेनचा गुजरातमधील टप्पा प्रथम सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
हे ही वाचा:
गुजरात सरकार आणि लोकांचे आभार मानताना एनएचएसआरसीएलचे संचालक अचल खरे यांनी सांगितले की गुजरातमधील ३५२ किमी लांबीच्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनापैकी ९५ टक्के भूसंपादन झाले आहे. याऊलट महाराष्ट्रातील १५६ किमीसाठी लागणाऱ्या भूसंपादनापैकी केवळ २३ टक्के भूसंपादनाचे काम झाले आहे.
जर महाराष्ट्रातील संपूर्ण भूसंपादनाचे काम पुढीत तीन महिन्यात पूर्ण झाले तरच संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्रितपणे सुरू केला जाऊ शकतो. अन्यथा या प्रकल्पाचा गुजरातमधील टप्पा आधी पूर्ण करून महाराष्ट्रामधील भाग दुसऱ्या टप्प्यात चालू करण्यात येईल.
“महाराष्ट्रात भूसंपादनात आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. आम्ही जपानी गुंतवणुकदारांशी गुजरातमधील भाग आधी चालू करण्यासंदर्भात बोलणी करत आहोत.” असेही त्यांनी सांगितले.
खरे यांनी हे देखील सांगितले की या प्रकल्पाची २०२३ची मुळ मुदत पाळली जाणे आता अशक्य आहे. २०२४ मध्ये गुजरातमधील नागरी कामे पूर्ण होणे देखील अशक्य आहे. गुजरातमधील ३५२ किमी लांबीच्या मार्गिकेसाठी आणि पाच स्थानकांसाठी ₹३२,००० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.