22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषभारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या 'डी' गँगपर्यंत

भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत

अमली पदार्थांच्या गोळ्या आणि पावडरच्या व्यापाराचा कोट्यवधींचा डोलारा

Google News Follow

Related

गुजरातच्या अमली पदार्थविरोधी पथकाला भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचे आढळून आले आहे. त्यातील सुमारे ४० जणांचा संबंध आयसएआय, कुख्यातगुंड दाऊद इब्राहिम आणि अफगाणिस्तानच्या ड्रग माफियांशी आहे. या सर्वांनी अमली पदार्थांच्या गोळ्या आणि पावडरच्या व्यापाराचा कोट्यवधींचा डोलारा उभा केला आहे.

 

हाजि सलीम याच्या कराची, लाहोर, दुबईमध्ये मालमत्ता आहेत. तर, कमांडोंचा सहभाग असणारे स्वतःचे खासगी लष्करही त्याने तैनात केले आहे, अशी माहिती गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने दिली. त्याच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात त्याच्याभोवती शस्त्रास्त्रे हातात घेतलेले सुरक्षारक्षक आहेत.

 

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका पाकिस्तानी बोटीतून सुमारे ४०० किलो हेरॉइन गुजरातच्या किनाऱ्यावरून जप्त करण्यात आले होते. तेव्हा हा माल शेख कानेघी उर्फ हाजीचा असल्याचे कळले होते. तर, या मे महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतील नौदलाने कोचीमध्ये समुद्रमार्गे आलेले अडीच हजार किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते. यामागेही हाजीचाच हात असल्याचे मानले जाते. भारतामध्ये डझनभर केस दाखल असलेला हाजीच भारत, श्रीलंका आणि आफ्रिकन देशामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणारा मुख्य माफिया असल्याचे मानले जात आहे. तो बलुचिस्तानमधील तुर्बत येथून भाऊ शाहनवाझ आणि मेव्हणा हाजी गनी याच्या मदतीने सारी सूत्रे हलवतो.

 

हे ही वाचा:

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; तारखा जाहीर

श्री राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यात लता दीदींचा स्वर गुंजणार

ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या

भारताने कांगारुंना पिशवीत घातले, चेन्नईत ६ विकेट्सनी मोठा विजय

‘त्याला अफगाण ड्रग माफिया आणि कराचीमधील पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचा पाठिंबा असल्याचे आम्हाला कळले आहे. तो जगभरात अगदी खुलेआमपणे फिरतो,’ असे गुजरातचे एटीएस अधिकारी यांनी डिसेंबर २०२२मध्ये सांगितले होते. भारताच्या तटरक्षक दलानेही गेल्या वर्षी २६ डिसेंबर रोजी अल सोहेली ही पाकिस्तानी बोट पकडली होती. तेव्हा बोटीवर १० जण होते. तेव्हा त्या बोटीतून ४०० किलो हेरॉइन, इटलीच्या बनावटीची सहा पिस्तुले, १२ मॅगझिन्स आणि १२० काडतुसे जप्त करण्यात आली होती. हा सर्व माल पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादार बंदरातून भरण्यात आला होता. हे सर्व तस्कर हेरॉइनपासून मेथॅम्फेटामाइनसारख्या अमली पदार्थांकडे वळले आहेत. मेथॅम्फेटामाइन बनवण्यासाठी एफेड्राइन मीठ आणि थंड औषधांचा वापर केल जात आहे.

 

 

ऑगस्ट २०२१मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने अफूच्या लागवडीला आळा घातला आहे. अफूपासूनच हेरॉइन मिळवले जाते. परिणामी, हेरॉइनच्या तुटवड्यामुळे हे अमली पदार्थ तस्कर हेरॉइनकडे वळल्याचे मानले जात आहे. सिंथेटिक ड्रग्सची निर्मिती करणे हा ड्रग माफियांसाठी अधिक किफायतशीर पर्याय आहे, ज्यांचा मुख्य व्यावसायिक हाजी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा