32 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषगुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तिघांचा मृत्यू, सुमारे २०,००० लोक स्थलांतरित !

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तिघांचा मृत्यू, सुमारे २०,००० लोक स्थलांतरित !

हवामान विभागाकडून २९ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Google News Follow

Related

पुढील काही दिवस गुजरात आणि सौराष्ट्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला असून आज देखील पावसाचा जोर तसाच आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास २०,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अद्ययावत बुलेटिननुसार, २९ ऑगस्टच्या सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंगळवारपासून पुढील तीन दिवस गुजरातमधील २७ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  रेड अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये कच्छ, मोरबी, सुरेंद्रनगर, जामनगर, राजकोट, द्वारका, पोरबंदर, गीर सोमनाथ, जुनागढ, पंचमहाल, दाहोद, तापी, नवसारी, वलसाड, अहमदाबाद, बोताड, अमरेली, आनंद, खेडा, महिसागर,  पंचमहाल, नर्मदा, वडोदरा, छोटा उदेपूर, सुरत आणि डांग्स यांचा समावेश आहे.

हे ही वाचा :

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात २५ हजार कोटींच्या उलाढालीचे थर

भाजपमध्ये प्रवेश करणार चंपाई सोरेन, दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट !

बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने

दरम्यान, बनासकांठा, पाटण, मेहसाणा, गांधीनगर, साबरकांठा आणि अरवली या उर्वरित सहा जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीनुसार, २८ ऑगस्टपर्यंत गुजरातमध्ये आणि राज्याच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर ४०-५०  किमी प्रतितास वेगाने ६० किमी वेगाने वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत वडोदरा, पंचमहाल, जामनगर, जुनागढ आणि कच्छसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व प्रमुख शहरांतील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांची आभासी बैठक घेतली. राज्याच्या शिक्षण विभागाने मंगळवारी राज्यातील प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा