मजुरांनी मोफत काम करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या एका माणसाने हातावर पोट असणाऱ्या १५ मजुरांच्या कुटुंबांची घरे पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात घडली आहे. या माणसाला अटक करण्यात आली आहे. मजुरांना जीवे मारण्यासाठी या झोपड्या जाळण्यात आला. मात्र या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
मोहम्मद रफिक कुंभार असे या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद हा अंजर भागातून कामगारांना घेऊन जात असे आणि त्यांना पैसे देत नसे, असा आरोप या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या बद्रिनाथ गंगाराम यादव या कामगाराने केला आहे. मजुरांनी मोफत काम करण्यास नकार दिल्यानंतर आरोपी संतापला होता आणि त्याने सर्व झोपड्या जाळण्याची धमकी शनिवारी दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने खत्री बाजाराजवळील सर्व झोपड्यांना आग लावली.
हे ही वाचा:
“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”
“इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे ‘फॅमिली’ गॅदरिंग”
रमझानच्या दिवशी दुकान उघडे ठेवले म्हणून बांगलादेशात हिंदू व्यक्तीला मारहाण
हरवलेल्या दोन भावांचे मृतदेह आढळले मनपा पाण्याच्या टाकीत!
त्यावेळी झोपड्यांमधील सर्वजण गाढ झोपेत होते. मात्र सर्व कुटुंबांनी या आगीतून कशीबशी स्वतःची सुटका केली. यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र एक मांजर आणि तिच्या सात पिल्लांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.
अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत या कुटुंबांचे सर्व साहित्य जळून खाक होऊन ते बेघर झाले होते. या प्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल केल्याची माहिती कच्छचे पोलिस अधीक्षक सागर बगमार यांनी दिली.