28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषगुजरातला ‘बिपरजॉय’चा तडाखा! वादळाने घेतला पिता-पुत्रांचा प्राण

गुजरातला ‘बिपरजॉय’चा तडाखा! वादळाने घेतला पिता-पुत्रांचा प्राण

बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये हाहाःकार

Google News Follow

Related

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अखेर गुरुवार, १५ जून रोजी गुजरातमध्ये धडकले. या वादळाच्या भीषण स्वरूपाचा अंदाज यापूर्वीचा वर्तवण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार अलर्ट मोड वर होते. प्रशासनाने आधीच सर्व तयारी केली होती. त्यामुळे मोठं नुकसान झालं नसलं तरी मात्र, बिपरजॉयमुळे गुजरातमध्ये हाहाःकार उडाला.

‘बिपरजॉयने’ महाराष्ट्र आणि राजस्थानला तडाखा देत गुजरातमध्ये मात्र प्रचंड कहर केला. या वादळामुळे गुजरातच्या कच्छमध्ये दरडी कोसळल्या. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब कोसळले. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसही गुजरातच्या किनारी भागात झाला. गुजरातच्या भुजमध्ये सुमारे २०० विजेचे खांब कोसळले आहेत. तसेच काही वीज उपकेंद्र ठप्प झाल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही. रस्त्यांवरही अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. द्वारका आणि कच्छमध्येही साधारण अशीच परिस्थिती आहे.

जनावरांना वाचवायला गेलेल्या पिता-पुत्रांचा मृत्यू

वादळामुळे पिता-पुत्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली. या वादळामुळे गुजरातमध्ये २२ जण जखमी तर २३ जनावरांचा मृत्यू झाला. भावनगरमध्ये पावसाचे पाणी अचानक आल्याने शेळ्यांचा कळप खड्ड्यात अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी गेलेले रामजी परमार (५५) आणि त्यांचा मुलगा राकेश परमार (२२) हे दोघे खंटी येथे गेले, मात्र जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले. यावेळी २२ शेळ्या आणि एका मेंढीचाही मृत्यू झाला.

हे ही वाचा:

आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार

मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?

अंतराळातून ‘बिपरजॉय’ असं दिसतं!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

भारताच्या पश्चिम किनाऱ्याला ‘बिपरजॉय’ वादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज ६ जून रोजी वर्तवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून गुजरातमधील किनापट्टी भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं होतं. सुमारे ७४ हजारांहून अधिक लोकांना इतरत्र हलवण्यात आले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वादळाचा वेग प्रति तास ११५ किलोमीटर ते १२५ किलोमीटर होता. त्यामुळे वाऱ्याचा वेगही प्रचंड वाढला होता. या वादळाचा फटका गुजरातसह काही अंशी महाराष्ट्रालाही बसला. १६ जून आणि १७ जून रोजी काही भागात वादळाचा परिणाम राहणार असल्याची माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा