गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

गुजरात सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली

गुजरात सरकार ‘ समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत

गुजरात सरकार राज्यात ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. गुजरात सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशात समान नागरी कायद्याची चर्चा सुरु झाली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी समान नागरी कायद्यासाठी समिती गठित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असणार आहेत. तसेच या समितीमध्ये तीन ते चार इतर सदस्य असणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे.

देशभरातून समान नागरी कायदा लागनू करण्याची मागणी केली जातं आहे. त्यामुळे गुजरात सरकराने या महत्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेतला आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असंही पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

सेलिब्रेटीला पाहण बेतलं जीवावर, दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

यूपीएच्या भोंगळ संरक्षण धोरणाचे दौलत बेग ओल्डी एअर बेसवर दफन

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

समान नागरी कायद्या म्हणजे काय?

समान नागरी कायद्याच्या दृष्टीने सर्व समान आहेत. सर्व जाती, धर्म, लिंगाच्या व्यक्तींसाठी कायदा समान आहे. विवाह, घटस्फोट, दत्तक घेणं, वारसा हक्क, वारसा या सर्व बाबींपेक्षा देशात स्त्री-पुरुष समानता हा या कायद्याचा महत्वाचा मुद्दा आहे.

जर समान नागरी कायदा लागू झाला तर विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणं आणि मालमत्तेचं वितरण यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान नियम लावले जातील. समान नागरी संहिता समानरित्या देशातील सर्व नागरिकांवर लागू होतील. मग तो कोणत्याही धर्मातील असोत.

Exit mobile version