गुजरातमधील खंभात येथील काँग्रेस आमदार चिराग पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.राजीनामा दिल्यानंतर चिराग पटेल म्हणाले, “काँग्रेसमधून राजीनामा देण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण म्हणजे पक्षाची विचारधारा जी देशाच्या विरोधात आहे.तसेच काँग्रेस नेत्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन नाही, असे चिराग पटेल यांनी सांगितले.
आनंद जिल्ह्यातील खंभात मतदारसंघाचे पहिल्यांदाच आमदार झालेले पटेल यांनी आज सकाळी गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, असे स्पीकरच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. चौधरी यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, त्यांनी चिराग पटेल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ १६ वर आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी खंभातमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश रावल यांचा जवळपास ३,७०० मतांनी पराभव केला होता.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे होऊ शकतात इंडी आघाडीचे मनमोहन
इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!
ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला दणका; याचिका फेटाळल्या
राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीला जबाबदार धरले आणि परिस्थिती सुधारली नाही तर पक्षाचे आणखी काही आमदारही राजीनामा देऊ शकतात असा दावा त्यांनी केला. “माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.माझ्याप्रमाणेच अनेक आमदार आहेत ज्यांना पक्षात गुदमरल्यासारखे वाटत असल्याने ते नाराज असल्याचे पटेल यांनी सांगितले.