गुजरातमध्ये लव जिहादला वेसण

गुजरातमध्ये लव जिहादला वेसण

गुजरातच्या विधानसभेने अर्थसंकल्पाच्या अंतिम दिवशी ‘धर्मस्वातंत्र्य कायदा, २००३’ मध्ये दुरुस्ती सुचवणारे विधेयक मंजूर केले आहे. या दुरूस्तीचा हेतू बळजबरीने होणारी धर्मांतरे, जी लव्ह जिहाद या नावाने कुप्रसिद्ध आहेत, ती थांबवणे हा आहे.

अधिक चांगली जीवनशैली, दैवी शक्ती किंवा लग्नाच्या नवाखाली होणारी धर्मांतरे थांबवणे आणि या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी जबर दंड आणि शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

हे विधेयक विधिमंडळ कार्यमंत्री प्रदिपसिन्ह जडेजा यांनी सभागृहासमोर मांडले होते.

या पुर्वीचा कायदा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराविरोधात केला गेला होता. त्यानंतर सरकारच्या लक्षात आले की खोट्या आश्वासनांद्वारे देखील धर्मांतर केले जात आहे. चांगली जीवनशैली, दैवी शक्ती किंवा लग्नाच्या नावाने फसवणुक करून धर्मांतर घडवून आणले जात आहे. त्याला या कायद्याद्वारे पायबंद घालण्यात आला आहे.

हे ही वाचा:

वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा

भाजपा सत्तेवर आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही

कोरोनाची लागण झाल्यावर सचिन रुग्णालयात दाखल

या कायद्याद्वारे जो कोणी अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने धर्मांतर घडवत असेल तर त्याला तीन ते पाच वर्ष तुरूंगवास आणि/किंवा दोन लाख रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जर अशा तऱ्हेने अनुसुचित जाती, जमातीमधील स्त्री अगर पुरूषाचे लग्न होत असेल किंवा लग्न होत असलेली व्यक्त जर बालक असेल, तर ही शिक्षा चार ते सात वर्षांचा तुरूंगवास आणि तीन लाख रुपयांचा दंड अशा तऱ्हेची करण्यात आली आहे.

त्याबरोबरच अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने विवाह घडवून आणण्यासाठी लग्नापूर्वी अगर लग्नानंतर जर कोणी धर्मांतर केले असेल, तर कौंटुबिक न्यायालय अथवा तत्सम न्यायालयाद्वारे त्यास दोषी घोषित केले जाऊ शकते. इतकेच नाही, तर जर एखादी संस्था अशा प्रकारच्या लग्नासाठी कारणीभूत असेल किंवा स्वतःच असे लग्न घडवून आणत असेल, तर त्या संस्थेला तीन ते दहा वर्षांचा कारावास आणि/किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

या कायद्यातील तरतूदींनुसार अशाप्रकारे चुकीच्या मार्गाने धर्मांतर घडवून आणण्यात आलेले नाही हे सांगायची जबाबदारी आरोपीवर सोपवण्यात आली आहे. या कायद्यान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा मानला जाणार आहे.

Exit mobile version