सर्दी-खोकल्यासाठी सर्रास दिल्या जाणाऱ्या औषधांच्या पुनर्तपासणीचे निर्देश

केंद्रीय औषध नियमक मंडळाकडून आदेश

सर्दी-खोकल्यासाठी सर्रास दिल्या जाणाऱ्या औषधांच्या पुनर्तपासणीचे निर्देश

केंद्रीय औषध नियमक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांकडून वेदना तसेच सर्दी-खोकल्यासाठी सर्रास दिल्या जाणाऱ्या तीन औषधांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्देश दिला आहे. केंद्रीय औषध नियमक मंडळाने ही औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना औषधांचा प्रभाव आणि सुरक्षेततेची चाचणी करण्यासाठी याच्या नव्याने ट्रायल घेण्याचे निर्देश दिले आहेत. सर्दी आणि खोकला झाल्यानंतर साधारणपणे दिली जाणारी औषधे आणि फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDCs) मधील एका पेन किलरचा या औषधांमध्ये समावेश आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, खोकला आणि सर्दीसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांची पुन्हा तपासणी करण्यासाठी नव्याने ट्रायल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही औषधे मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून विकली जात आहेत. त्यामध्ये एक पॅरासिटामॉल, फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड (नाकासंबंधी सर्दी-खोकल्याचे औषध) आणि कॅफीन एनहायड्रस (प्रोसेस्ड आणि कॅफीन) युक्त औषधांचा समावेश आहे.

केंद्रीय औषध नियमक मंडळाने तिसऱ्या पेन किलरसाठी पोस्ट मार्केटींग देखरेखीचा सल्ला दिला आहे. जेणेकरून त्याची सुरक्षा आणि प्रभाव याबद्दल डेटा तयार केला जाऊ शकेल. तसेच हे औषध नॉन-स्टेरॉयडल अँटी इंफ्लेमेटरी ड्रग अंतर्गत येते. वेदनेसाठी दिल्या जाणाऱ्या औषधाच्या प्रकरणात सौम्य भूमिका घेत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या डोकेदुखीसाठी औषध बनवणे आणि विक्री करणे यासाठी अटींसह परवानगी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

डाव्या पक्षांनी केली राहुल गांधी यांच्या मतदारसंघाची वाटणी!

हमासच्या २४पैकी १७ बटालियनचा निःपात!

अमेरिकेत भारतीय स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्डचा मार्ग खुला होणार

मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा

औषध नियमक मंडळाचा हा आदेश १९८८ च्या आधीच्या काही औषधांची तपासणी करण्यासाठी २०२१ मध्ये स्थापन झालेल्या एका तज्ज्ञ समितीच्या सूचनेनुसार देण्यात आला आहे.

Exit mobile version