लोकप्रिय मालिका ‘महाभारत’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची वयाच्या ७८ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
मालिका विश्वामधील महाभारतातील शकुनी मामा म्हणून प्रसिद्ध असलेले प्रख्यात आणि ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचे सोमवार, ५ जून रोजी सकाळी ९ वाजता निधन झाले. त्यांचा मुलगा हॅरी पेंटल यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
हे ही वाचा:
हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं
सुलोचना दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमात होणार अंत्यसंस्कार
अपघातानंतर बालासोर येथून ५१ तासानंतर पहिली रेल्वे निघाली, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना!
सुलोचना दीदी गेल्या, चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत
गुफी पेंटल यांनी मालिका विश्वात आपली ओळख बनवल्यानंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. रफू चक्कर, देस परदेस, दिल्लगी, मैदान- ए- जंग, दावा यासारख्या अनेक लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते. तर, छोटया पडद्यावर त्यांची कानून, सौदा, अकबर- बिरबल, ओम नमः शिवाय, मिसेस कौशिक की पांच बहुइन, कर्ण संघिनी आणि इतर ही त्यांची उल्लेखनीय कामे आहेत. जय कन्हैया लाल की या मालिकेत गुफी यांनी अखेरचे काम केले होते.