28 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरविशेष“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"

“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”

आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Google News Follow

Related

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कमधील सभेवरून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती आणि महाराष्ट्रात आता फक्त ठाकरेंची गॅरंटी चालते असे म्हणाले होती. यावरून आशिष शेलार यांनी ट्वीटकरत ठाकरेंवर निशाणा साधला. ‘कोमट’ पाण्यातील गॅरंटीच्या ‘चकल्या’, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

ज्यांच्या मुख्यमंत्री काळात मंत्री गेले, खासदार गेले..गेले आमदार आणि नगरसेवक ही.. जवळपास गेली ना, सगळीच पार्टी.. तेच सांगतात त्यांचीच चालते महाराष्ट्रात गॅरंटी ? ज्यांना त्यांच्याच माणसांनी केले पायउतार तेच स्वतःच्या गॅरंटीची स्वतःच वाजवतात सतार! एक PUC न काढलेले तोंड रोजच बोलते विश्वविख्यात प्रदुषण सकाळी सकाळी करते त्यांचाच संसर्ग त्यांच्याच पक्षात वाढतोय “कोमट” पाण्यात गॅरंटीच्या “चकल्या” बघा कोण पाडतोय? टोमण्यांची बॅग झाली वाटतं तपासणीत जप्त.. यांचा वॉरंटी संपलेलाफराळथोडा इथं खपतो, असे ट्वीटकरत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा : 

शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास!

दिल्लीत प्रदूषण वाढले; पाचवी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन भरणार

मुंबई शहरातील निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ

दरम्यान, उद्धव ठाकरे कालच्या एका सभेत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी पार्कवर सभा आहे. तेथील हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला भेट देवून जनतेकडे मताची मागणी करणार. ते पुढे म्हणाले, मोदींची गॅरंटी संपली असून महाराष्ट्रात आता ठाकरेंची गॅरंटी चालते.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा