वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) सप्टेंबर महिन्यातील संकलनात १०.२ टक्के वाढ होऊन ते एक कोटी ६२ लाख ७१२ कोटींवर पोहचले आहे. चालू आर्थिक वर्षात सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनाने १.६० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सण-उत्सव असल्याने यात अधिक वाढ होईल असा विश्वास अर्थ मंत्रालय आणि करतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय, कडक नियमन आणि ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोचा समावेश जीएसटी कक्षेत केल्यामुळे येत्या काही महिन्यांत महसुलात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जीएसटीच्या या संकलनामध्ये केंद्रीय जीएसटीत १८ टक्के वाढ होऊन ही रक्कम २९ हजार ८१८ कोटींवर पोहोचली आहे. तर, राज्य जीएसटीचा वाटा १९.४ टक्के वाढून ३७ हजार ६५७वर पोहोचला आहे. एकात्मिक जीएसटी ८३ हजार ६२३ कोटी रुपये जमा झाला आहे.
हे ही वाचा:
स्केटिंग रिलेमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई
ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!
तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!
यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील ४१ हजार १४५ कोटी रुपये कराचा समावेश आहे. याखेरीज उपकर ११ हजार ६१३ कोटी रुपये जमा झाला आहे. यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील ८८१ कोटी रुपये उपकराचाही समावेश आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात १.४७ लाख कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता.