ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी

कुन्नूर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्राणज्योत बुधवारी मालवली. तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला होता. यातील वरुण सिंह हे एकमेवर अधिकारी बचावले या दुर्घटनेतून बचावले होते. दुर्घटनेनंतर त्यांना बंगळुरूतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारताचे सीडीएस बिपीन रावत यांना नेत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन या अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि १३ जणांचे निधन झाले. या अपघातात वरुण सिंह बचावाले होते मात्र ते गंभीर जखमी झाले होते. अखेर बुधवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा:

आंबेडकर द लिजंड मध्ये हा अभिनेता करणार बाबासाहेबांची भूमिका

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला भारतात आणले

संतापजनक! MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा

पुण्यात मनसेला धक्का! रुपाली पाटील यांचा राजीनामा

वरुण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी केलेली देशसेवा कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना शौर्य पुरस्कार मिळाला होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतीय लष्कराच्या सेवेत आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील रहिवासी राहिलेले वरुण सिंह यांचे कुटुंब तिन्ही दलांत आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह स्वतः इंडियन एअरफोर्समध्ये होते. त्यांचे वडील रिटायर्ड कर्नल केपी सिंह लष्करातील एअर डिफेन्समध्ये तर वरुण यांचे भाऊ लेफ्टनंट कमांडर तनुज सिंह भारतीय नौदलात आहेत.

Exit mobile version