अभिनंदन! अभिनंदनचा वीर चक्रने सन्मान

अभिनंदन! अभिनंदनचा वीर चक्रने सन्मान

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी हल्ला करण्यासाठी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला होता तेव्हा पाकिस्तानी हवाई दलाला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या आणि पाकिस्तानी दलाचे अत्याधुनिक एफ- १६ विमान पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांचा आज सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे अभिनंदन यांना वीर चक्र देऊन त्यांचा गौरव करतील.

पाकिस्तानी दलाचे विमान पाडल्यानंतर अभिनंदन यांचे विमान देखील कोसळले होते आणि नंतर ते पाकिस्तानच्या हद्दीत सापडले होते. मात्र सुदैवाने त्यांची पाकिस्तानमधून सुटका झाली आणि ते सुखरूप भारतात परतले होते.

हे ही वाचा:

शिवसेना जिल्हाप्रमुखाला ‘गुटखा’ पडला महागात

पठाणकोटमधील आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

लेडीज पर्समध्ये लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

योगींच्या खांद्यावर मोदींचा हात, सर्वत्र फक्त त्याचीच बात!

भारतीय हवाई दलाचे हिरो अभिनंदन वर्धमान यांचे याच महिन्यात विंग कमांडर ते ग्रुप कॅप्टन असे प्रमोशन झाले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाला चोख उत्तर देणाऱ्या अभिनंदन यांना यापूर्वी शौर्य चक्र पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. अभिनंदन यांनी बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे अमेरिकन बनावटीचे एफ- १६ हे लढाऊ विमान पाडले होते. विशेष म्हणजे मिग- २१ या लढाऊ विमानाने त्यांनी ही कामगिरी केली होती. मिग- २१ लढाऊ विमानाच्या तुलनेत एफ- १६ हे अत्याधुनिक मानले जाते. अभिनंदन याचं विमान कोसळल्यानंतर ते पाकिस्तानी हद्दीत सापडले होते. सुदैवाने काही तासांतच त्यांची सुखरूप सुटका झाली होती.

Exit mobile version