28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषराजस्थानमध्ये वऱ्हाडांच्या कारला अपघात, ९ जणांचा मृत्यू!

राजस्थानमध्ये वऱ्हाडांच्या कारला अपघात, ९ जणांचा मृत्यू!

पोलिसांकडून ट्रक चालकाला अटक

Google News Follow

Related

राजस्थानमध्ये मध्यरात्री घडलेल्या रस्त्या अपघाताने सर्वांनाच हादरवून सोडले.मध्यप्रदेशाला लागून असलेल्या राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील अकलेरा पोलीस स्टेशन परिसरात लग्नाच्या वऱ्हाडांनी भरलेल्या कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला.या भीषण अपघातात ऐकून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. लग्नसमारंभ पार पडल्यानंतर वऱ्हाडी घरी परतत असताना हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी(२० एप्रिल) मध्यरात्री अकलेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री लग्न आटोपून लग्नातील पाहुणे तेथून परतत होते.अकलेरा ते घाटोली दरम्यान पाचौळा वळणावर लग्नातील पाहुण्यांनी भरलेली कारची आणि ट्रकची जोरदार धडक झाली.या अपघातात कारमधील सर्व लोकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.हे सर्व लोक बागरी समाजाचे होते.

हे ही वाचा:

‘आप’चा खोटारडेपणा उघडकीस; उपराज्यपालांचा दावा!

‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद, कत्तल करत रहा’

भारतीय महिला कुस्तीपटूंची कामगिरी!

गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. अपघातात ठार झालेल्यांपैकी सात अकलेरा येथील रहिवासी होते. तर एक हरणावडा आणि एक बारात सारोळा येथील रहिवासी होता.पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच वधू-वर दोघांच्याही घरात एकच गोंधळ उडाला. लग्नातील सर्वजण आपापली कामे सोडून घटनास्थळाकडे धावले. या अपघातामुळे विवाहितेच्या दोन्ही घरात शोककळा पसरली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा