नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!

वराने माफी मागितली पण उशीर झाला होता

नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!

वधूपक्षाने पाहुण्यांना ‘चिकन चंगेझी’ हा पदार्थ देण्यास नकार दिल्याने नाराज झाल्याने नवऱ्याने लग्नच रद्द केल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या वधूपक्षाने पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी वराला ताब्यात घेतले. त्यामुळे या वराला पोलिस कोठडीत एक रात्र काढावी लागली. अखेर शुक्रवारी त्याच्या कुटुंबीयांनी माफी मागितल्यानंतर आणि वधूपक्षाला भेटवस्तू परत केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

हा निकाह सोहळा १० मे रोजी रामपूर जिल्ह्यातील अझीमनगर येथे होणार होता. ‘वऱ्हाड येण्याच्या काही तास आधी आम्ही वराला फोन केला. मात्र त्याने त्याच्या हिंदू पाहुण्यांसाठी खास शाकाहारी जेवण आणि चिकन चेंगझीची मागणी केली. आमच्याकडे मेनूमध्ये फक्त म्हशीच्या मांसाचे पदार्थ होते. स्वयंपाकीनेही चिकन चेंगजी पदार्थ तयार करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे तो तयार करण्यास असमर्थता दर्शवली होती. याबाबत वराला सांगितल्यावर तो चिडला. तसेच, त्याने आमच्या नातेवाइकांशीही गैरवर्तन केले.

हे ही वाचा:

पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची पदकांची लूट  

जितेंद्र आव्हाड यांचे ईव्हीएम ‘घोटाळ्या’चे अजब तर्कट

द केरळ स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची प्रथा जुनीच !

अकोल्यात दोन गट एकमेकांना भिडले; एकाचा मृत्यू

लग्न मोडले,’ असे वधूचा मोठा भाऊ मोहम्मद आसिफ यांनी सांगितले. त्यानतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. स्थानिक पंचायत सदस्यांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. वराने माफी मागितली आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र वधूने तो प्रस्ताव धुडकावून लावला. तर, वराच्या एका नातेवाइकाने वेगळी माहिती दिली. “माझ्या पुतण्याने त्याच्या मित्रांसाठी शाकाहारी जेवण आणि शक्यतो कोंबडीचे पदार्थ देण्याची विनंती केली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. लग्न आमच्याकडून नव्हे तर मुलीच्या घरच्यांनी रद्द केले,’ असे ते म्हणाले.

Exit mobile version