23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषइस्रोच्या लाँचपॅडवरील 'चिनी ध्वजा' च्या मुद्यावरून स्टॅलिन यांना चिनी भाषेत शुभेच्छा!

इस्रोच्या लाँचपॅडवरील ‘चिनी ध्वजा’ च्या मुद्यावरून स्टॅलिन यांना चिनी भाषेत शुभेच्छा!

भारतीय जनता पक्षाचे ट्विट

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) नवीन प्रक्षेपण संकुलाशी संबंधित ‘चीनी ध्वज’ दर्शविलेल्या जाहिरातीवरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंदारिन भाषेत शुभेच्छा देऊन भाजपने शुक्रवारी त्यांची टीका केली. तामिळनाडू भाजपच्या वतीने मुख्यमंत्री स्टॅलिन यांना त्यांच्या आवडत्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो! असे भाजपने ट्विट केले आहे.

हेही वाचा..

पुतीन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र युद्धाची धमकी

वायनाडमध्ये कॉलेजवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या; डाव्या चळवळीतील संघटनेच्या सहा सदस्यांना अटक

ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी

ढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्पेसपोर्टच्या पायाभरणी कार्यक्रमापूर्वी बुधवारी सर्व प्रमुख दैनिकांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली. ही जाहिरात जारी करणारे डीएमके नेते, मत्स्यव्यवसाय मंत्री अनिथा आर राधाकृष्णन म्हणाले की हे डिझाइनरने केलेले घोटाळे आहे आणि पक्षाचा इतर कोणताही हेतू नाही. तिरुनेलवेली येथे एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. त्यांनी तामिळनाडूतील इस्रोच्या लॉन्चपॅडचे श्रेय घेण्यासाठी चीनचे स्टिकर चिकटवले आहे. हा आमच्या अवकाश शास्त्रज्ञांचा, अवकाश क्षेत्राचा अपमान आहे.

डीएमकेचे खासदार पी. विल्सन यांनी ट्विट केले आहे की, पंतप्रधानांना चिनी ध्वज एका कागदी जाहिरातीमध्ये हॉक आय व्हिजनसह दिसू शकतो, तरीही, गेल्या १० वर्षांत चिनी ध्वज भारतीय हद्दीत फडकत असल्याच्या वृत्ताकडे त्यांनी डोळेझाक केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा