महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन!

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे उपस्थिती लावली.

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन!

आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. आज साऱ्या राज्यभर महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्याचा वर्धापन दिन साजरा केला. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे उपस्थिती लावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

आज ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे उपस्थिती लावली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.

तसेच त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय समारंभ दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संपन्न झाला. या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ‘सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा! संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मी अभिवादन करतो,’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

कुस्तीगीरांचे आंदोलन म्हणजे हुडा आणि बजरंग पुनिया यांचा कट

मद्यपी पोलिसांना हिमंता बिस्वसर्मांनी कायमचे घरी पाठवले

उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!

नेपाळवरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सकाळी राष्ट्रध्वज वंदन करून संचलन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version