देशभारतील एकूण २१ ठिकाणी ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मान्यता दिली आहे. या मध्ये महाराष्ट्रातील ठिकाणांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार मार्फत ही माहिती देण्यात आली. भाजपा नेते आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
या २१ ठिकाणांमध्ये महाराष्ट्रातील तीन ठिकाणांचा समावेश आहे. नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि शिर्डी अशा तीन विमानतळांचा यात समावेश आहे. यापैकी सिंधुदुर्ग आणि शिर्डी हे दोन्ही विमानतळ कार्यान्वीत करण्यात आले आहेत.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई दळणवळणाला चालना देण्यासाठी आणि परवडणारी हवाई वाहतूक जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रादेशिक हवाई दळणवळण योजना (RCS) – UDAN (उडान अर्थात उडे देश का आम नागरिक) सुरू केली. या योजनेंतर्गत विमानतळांचा विस्तार विकास ‘मागणीवर आधारित’ असून विविध सवलती पुरवण्यासाठी राज्य सरकार तसेच विमानकंपनी चालकांच्या प्रतिबद्धतेवर अवलंबून आहे.
हे ही वाचा:
हा सायकलचालक म्हणजे ‘मानवनियंत्रित स्कूटर’
पालिकेची पलटी; नारायण राणेंच्या अधीश बंगल्याला दिलेली नोटीस घेतली मागे
योगी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये लखनऊ पोलिसांची पहिली चकमक
या उडान योजने अंतर्गत उत्तर प्रदेशसह देशभरात विविध ठिकाणी १४ जल विमानतळ आणि ३६ हेलिपॅडसह १५४ विमानतळ निश्चित करण्यात आले आहेत. १४ मार्चपर्यंत या योजने अंतर्गत ८ हेलीपोर्ट्स आणि २ जल विमानतळांसह ६६ सेवेत नसलेल्या आणि सेवेत कमी असलेले विमानतळ कार्यान्वित केले गेले आहेत.